spot_img
spot_img
spot_img

लोणावळ्यात ठाकरे गटाला धक्का, माजी नगरसेवक शिवदास पिल्ले शिवसेनेत

खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत प्रवेश
शबनम न्यूज: प्रतिनिधी
मावळ – लोणावळा नगरपरिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु असतानाच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे  शहरप्रमुख व माजी नगरसेवक शिवदास पिल्ले, लोणावळा उपशहरप्रमुख नरेश काळवीट यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
यावेळी जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर, तालुका प्रमुख रामभाऊ सावंत, लोणावळा शहर प्रमुख संजय भोईर, युवासेनेचे विशाल हुलावळे,दत्ता केदारी,नवनाथ हरपुडे उपस्थित होते. लोणावळा नगरपरिषद निवडणुकीसाठी सोमवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली. अर्ज भरण्याच्या दुसऱ्याच दिवशी खासदार बारणे यांनी ठाकरे गटाला दणका दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते पक्षात येत आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच मूळ शिवसेना आहे. त्यामुळे राज्यभरातील ठाकरे गटातील पदाधिकारी शिवसेनेत येत आहेत.
शिवसेना लोणावळा नगरपरिषदेची निवडणूक ताकदीने लढविणार आहे. लवकरच उमेदवारांबाबतचा निर्णय घेण्यात येईल. तळेगाव दाभाडे शहरात भाजप-राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा सुरु आहे. वडगाव नगरपंचायत निवडणूक भाजपसोबत लढविण्यात येणार आहे. या निवडणुकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल, असेही खासदार बारणे यांनी सांगितले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!