पिंपरी चिंचवड; प्रतिनिधी:
पिंपरी चिंचवड शहरातील के विले – श्रीनगर- बाप देव नगर या मुख्य रस्त्यावर गेल्या अनेक दिवसापासून ड्रेनेजचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत, रस्ता खचलेला आहे. या मुख्य रस्त्यावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते तरी हा रस्ता त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाचे चिंचवड विधानसभेचे उपाध्यक्ष बापू दिनकर कातळे यांनी केली आहे.
बापू कातळे यांनी सदर निवेदन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ब क्षेत्रीय कार्यालयातील स्थापत्य विभागाला दिली आहे. कातळे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की सदर रस्ता हा वाहतुकीला अडथळा निर्माण करणारा होत आहे. येथे अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे सदर रस्ता हा त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी बापू कातळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
पावसाळ्यामध्ये या रस्त्यावर पाणी साचले असताना , येथील रस्त्यांची परिस्थिती अधिकच गंभीर होत चालली होती. त्यावेळी बापू कातळे यांनी स्वखर्चाने सदर रस्ता दुरुस्त केला होता.परंतु आता या रस्त्याचा वापर स्थानिक नागरिक शालेय विद्यार्थी तसेच सार्वजनिक व खाजगी वाहने मोठ्या प्रमाणात करतात.
सध्याची अवस्था नागरिकांच्या जीवितास आणि वाहनांना धोका निर्माण करणारी आहे. त्यामुळे सदर रस्ता हा त्वरित दुरुस्त करावा ,रस्त्यावरील खड्डे बुजवावे, रस्त्यावर पक्के डांबरीकरण करावे अशी मागणी बापू दिनकर कातळे यांनी महानगरपालिकेच्या ब प्रभाग कार्यालयातील स्थापत्य विभागाकडे केली आहे.








