शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आगामी महानगरपालिका निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाली आहे. या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात पदाधिकाऱ्यांचे नियुक्त्या नुकतेच जाहीर करण्यात आल्या. यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील माजी नगरसेवक कैलास बारणे यांची चिंचवड विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठ्या ताकदीने उतरणार आहे. यासाठी ही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून राष्ट्रवादी पक्ष हा तयारीला लागला आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील एकूण 168 पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
आगामी महानगरपालिका निवडणूक ही जिंकायचीच, असे ठरवून राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सदर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. आज आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी पदाधिकारी नियुक्ती बाबत माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सदर नियुक्तीनंतर कैलास बारणे यांचे सर्व स्तरातून अभिंनदन होत आहे.


