शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे मेट्रोने फीडर बससेवेची विस्तार आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार निवडण्याचा निर्णय घेतला आहे. मेट्रो स्थानकांसोबत फीडर बस सेवांची कनेक्टिव्हिटी वाढून नागरिकांना शहरभर प्रवास करणे अधिक सुलभ आणि जलद शक्य होईल.
पुणे मेट्रोचे प्रशासन आणि जनसंपर्क संचालक चंद्रशेखर तांबवेकर म्हणाले की, फीडर सेवांचा वापर करणाऱ्या प्रवाशांपैकी ३० टक्के प्रवासी फिडरचा वापर करत असल्याचे लक्षात आल्यानंतर पुणे मेट्रोने सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. तो नवीन मार्गांचा अभ्यास करून अस्तित्वात असलेल्या मार्गांचा फेरविचार करेल. सध्या, पीएमपीएमएलकडून विविध मेट्रो मार्गांसाठी ३८ फीडर बसेस सुरू आहेत. यापैकी ६० टक्के मार्गिकांना चांगला प्रतिसाद आहे. सध्या सरासरी २५ ते ५० मिनिटांच्या अंतराने या मार्गांवर फिडर बसेस धावतात. गेल्या काही महिन्यांत मेट्रोचे प्रवासी वाढले असून, प्रतिदिनी सरासरी २ लाखांपेक्षा अधिक प्रवासी आहेत. मात्र, ते स्थानकांवर येण्यासाठी खासगी वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. त्यामुळे पार्किंगचा मोठा प्रश्न होत आहे. फिडर सेवा वाढल्यास खासगी वाहनांची संख्या कमी होईल.








