spot_img
spot_img
spot_img

चांगलं पेरलं तरच चांगलं उगवेल! पिंपरी-चिंचवड काँग्रेसचा नव्या जोमानं जनतेकडे मोर्चा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नव्या उमेदीनं आणि जोमानं पुन्हा एकदा जनतेच्या मनात काँग्रेसचा झेंडा रोवण्यासाठी सज्ज झाले आहेत. बारामती मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार स्व. शंकर बाजीराव पाटील यांच्या विजयासाठी शहर काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचाराच्या रणांगणात उतरले असून, “माझा पक्ष, माझी जबाबदारी” या भावनेतून एकदिलानं कामाला लागले आहेत.

पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब, अजित पवार साहेब, बापूसाहेब थिटे आणि अण्णासाहेब मगर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा जनतेच्या विश्वासाचं बळ बनवण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रामाणिक आणि निष्ठावंत काँग्रेस पदाधिकारी घराघरांत जाऊन जनसंपर्क साधत आहेत. वाडी-वस्त्यांत पायपीट करून काँग्रेसची विचारधारा आणि विकासधोरण जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम उत्साहाने सुरू आहे.

काँग्रेसचा गौरवशाली इतिहास

१९८६-८७ साली स्थापन झालेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पहिले महापौर म्हणून ज्ञानेश्वर लांडगे निवडून आले होते. स्थायी समितीचे अध्यक्ष बाबासाहेब तापकीर, उपमहापौर आणि विविध समित्यांचे प्रमुख हे सर्व काँग्रेसचे होते. १९९२ आणि १९९७ सालीही काँग्रेसचेच महापौर झाले, तर २००२ मध्ये उपमहापौरपद काँग्रेसकडे राहिलं. त्या काळात काँग्रेसचं शहरातील वर्चस्व निर्विवाद होतं.

मात्र, गेल्या दोन दशकांत स्थानिक नेतृत्वातील मतभेद आणि अंतर्गत गटबाजीमुळे पक्षात हळूहळू गळती सुरू झाली. काही नेत्यांनीच पक्षाला दुर्बल करण्याचे काम केल्याची भावना आजही कार्यकर्त्यांमध्ये आहे. तरीही पिंपरी चिंचवडचा मतदार आजही काँग्रेस विचारधारेचा आहे, हे अलीकडच्या जनआंदोलनांतूनही दिसून आलं.

भूतकाळापासून भविष्याकडे नव्या जोमानं

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे भाउसाहेब भोइर यांना उमेदवारी मिळाली होती; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोरीमुळे पराभव झाला. त्यानंतर २०१४ आणि २०१९ मध्ये पक्षाला डावलण्यात आलं, आणि त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढली.
२००२ मध्ये ३३ नगरसेवक असलेला काँग्रेस पक्ष २०१७ पर्यंत जवळजवळ शून्यावर आला — याला स्थानिक नेतृत्वाचं अपयशच कारणीभूत ठरल्याचं मत कार्यकर्त्यांनी मांडलं आहे.

तरीदेखील, पूर्वीप्रमाणेच आजही पिंपरी चिंचवडमध्ये सर्व जाती-धर्माचे लोक काँग्रेसला मानतात. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नगर, जळगाव, नाशिक, कोकण आदी भागांतील लोक येथे स्थायिक झाले असून, त्यांनीच काँग्रेसचा पाया मजबूत केला. अॅम्युनेशन फॅक्टरी, टेल्को, बजाज ऑटो, किर्लोस्कर, महिंद्रा, एचए कंपनी यांसारख्या उद्योगांमध्ये काम करणारा हा वर्ग काँग्रेसचा मुख्य आधारस्तंभ ठरला.

“पुन्हा एकदा नवा ध्यास, काँग्रेसचा विजय हा आमचा श्वास”

शहर काँग्रेस कमिटीच्या आवाहनानुसार सध्या कार्यकर्ते “पुन्हा एकदा नवा ध्यास, काँग्रेसचा विजय हा आमचा श्वास” या घोषवाक्याखाली प्रचारयात्रा राबवत आहेत. जनतेशी प्रत्यक्ष संवाद साधून पक्षाची भूमिका स्पष्ट करत आहेत.

२००० पासून आजपर्यंत पिंपरी चिंचवड काँग्रेसला बळकट करण्यासाठी सतत कार्य करणारे कार्यकर्ते आता बारामतीच्या निवडणुकीत पक्षाच्या विजयासाठी पूर्ण ताकदीनं काम करत आहेत.
शहरात पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा उंचावण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा निर्धार स्पष्ट दिसून येत आहे.

“चांगलं पेरलं तरच चांगलं उगवेल” —
हीच भावना घेऊन पिंपरी चिंचवड काँग्रेस पुन्हा नव्या उमेदीनं मैदानात उतरली आहे.

संदेश दत्तात्रेय नवले,
सरचिटणीस, ग्रामीण ब्लॉक काँग्रेस, पिंपरी चिंचवड

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!