शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरातील आर के एच वृंदावन, रो हाऊस सोसायटी परिसरात अनेक दिवसापासून स्ट्रीट लाईट नव्हती, त्यामुळे येथील रहिवासी नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला व मुली यांना रात्रीच्या वेळी येताना आणि जाताना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या परिसरात नोकरी करणाऱ्या महिला, मुली व नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. रात्रीच्या वेळी नोकरीवरून घरी येताना त्यांना मोठा अडथळा निर्माण होत होता. या सर्व परिस्थितीची दखल या भागातील भाजपचे युवा नेते निखिल बोऱ्हाडे यांनी घेतली.
निखिल बोऱ्हाडे यांनी या समस्या सोडविण्यासाठी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनामार्फत येथील रस्त्यांवर स्ट्रीट लाईट चे खांब उभारण्याची मागणी केली, त्याचा व्यवस्थित पाठपुरावा केला. त्यांच्या या मागणीला यश आले असून, या परिसरात स्ट्रीट लाईट चे खांब उभारण्याचे काम पूर्ण झाले. या परिसरातील नागरिकांना सुरक्षित वातावरण या निमित्ताने निर्माण झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. निखिल बोऱ्हाडे यांच्या या कार्यकर्तृत्वामुळे येथील रहिवासी नागरिक यांनी त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले.








