spot_img
spot_img
spot_img

प्रदीप जांभळे-पाटील यांनाच मुदतवाढ द्या ; महापालिकेची मागणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांची ३१ ऑक्टोबरला बदली झाली. त्यांच्याआधीच आयुक्त शेखर सिंह यांची बदली होऊन महापालिकेचा कारभार मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे दिला आहे. ते बिहार निवडणुकीत निरीक्षक म्हणून व्यस्त आहेत. तर महापालिकेला अतिरिक्त आयुक्त मिळत नसल्याने प्रदीप जांभळे यांना ११ नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ द्यावी. त्यानंतरच त्यांना कार्यमुक्त करण्यात यावे अशी मागणी महापालिका प्रशासनाने नगर विकास विभागाकडे केली आहे.

महापालिकेचे तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांची बदली झाल्यानंतर वन व महसूल विभागाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी मोनिका ठाकूर यांची नियुक्ती केली. भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या खात्यातून बदली झाल्याने त्यांनी नगरविकास विभागाचे मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यावर कुरघोडी केली असल्याची चर्चा झाली. मात्र, मोनिका ठाकूर यांच्या नियुक्तीला नगरविकास विभागाने खोडा दिला. जोपर्यंत नगरविकास विभागाचा आदेश येत नाही तोपर्यंत महापालिकेमध्ये रुजू होता येत नाही. त्यांची बदली होऊन १५ दिवसांपेक्षा जास्त काळ लोटला असतानाही त्या रुजू होऊ शकल्या नाही. तर नगरविकास विभागाने दुसऱ्या कोणत्याही अधिकार्याची बदली अतिरिक्त आयुक्तपदी केली नाही. त्यामुळे जांभळे-पाटील यांच्या बदलीनंतर ही जागा रिक्त झाली.

दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला होणार आहे. त्यासाठी जांभळे-पाटील यांना मुदतवाढ देण्याची मागणी प्रशासनाने केली आहे. महापालिका निवडणूक विभागातील निवडणूक विषयक संपूर्ण कामकाज जांभळे पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. निवडणुकीच्या कामकाजाअंतर्गत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करायची आहे. तसेच ११ नोव्हेंबरला आरक्षण सोडत काढायची आहे. निवडणूक विषयक तातडीचे कामकाज विचारात घेता ११ नोव्हेंबर २०२५ रोजी होणाऱ्या आरक्षण सोडत कामकाजानंतर कार्यमुक्त करण्यास मान्यता द्यावी. तसेच अतिरिक्त आयुक्त या रिक्त पदावर अन्य अधिकाऱ्याची नेमणूक व्हावी अशी विनंती महापालिकेच्या सामान्य प्रशासनाने केली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!