शबनम न्यूज | प्रतिनिधी
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1875 साली लिहिलेले वंदेमातरम हे गीत भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात देशभक्ती एकता आणि मात्र भूमी प्रेमाचे प्रतीक ठरले. हे गीत आपल्या राष्ट्रगीताप्रमाणेच आदराचे स्थान राखते आणि देशभक्तीची प्रेरणा देणारे म्हणून ओळखले जाते.
दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी वंदेमातरम गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाने राज्यभरातील शाळा, महाविद्यालयात वर्षभर विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार आज चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, संचालिका डॉ तेजल शहा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ वनिता कुऱ्हाडे यांच्या मुख्य संयोजनात इयत्ता अकरावी व इयत्ता बारावी मधील विज्ञान, कला आणि वाणिज्य विभागातील सुमारे बाराशे हून अधिक विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यासमवेत सामुदायिक वंदेमातरम गीत गायले. व आपल्या देशाबद्दल चे प्रेम आणि आदर यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाच्या आयोजनात क्रीडा विभागाचे प्रमुख डॉ शबाना शेख, डॉ अभय पोद्दार आदींनी विशेष परिश्रम घेतले.








