शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 26 मधील जगताप डेअरी , विशाल नगर, पिंपळे निलख येथील क्षितिज कॉलनी दोन या रहिवासी वस्तीमध्ये अनधिकृत लॉजिंग बोर्डिंग सुरू आहे, या लॉजिंग बोर्डिंग ला कोणत्याही प्रकारची मान्यता नाही, असं असतानाही राजरोसपणे हे लॉजिंग सुरू आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना विशेषतः महिला भगिनींना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महिलांना व मुलींना तर घराबाहेर पडणे ही कठीण झाले आहे. तरी या सर्व अनधिकृत लॉजिंग वर कारवाई करावी व हे अनधिकृत लॉजिंग बंद करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला शहर संघटिका सौ. मीरा कदम यांनी केली आहे.
सदर मागणीचे निवेदन मीरा कदम यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे. निवेदन मिळताच अजितदादांनी आपण यावर त्वरित कारवाई केली जाईल असे आश्वासन मीरा कदम यांना दिले.
तसेच याबाबतीत मीरा कदम यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. जोपर्यंत पोलिसांच्या वतीने सदर अनधिकृत लॉजिंग वर कारवाई होत नाही, तोपर्यंत आपण ठिय्या आंदोलन करणार असल्याचाही इशारा मीरा कदम यांनी दिला.
याप्रसंगी मीरा कदम यांच्या सोबत यांच्यासोबत प्रभाग क्रमांक 26 मधील रहिवाशी , नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


