शबनम न्यूज | प्रतिनिधी
नवी सांगवीतील लोकनेते लक्ष्मणभाऊ पांडुरंग जगताप भाजी मार्केट येथे गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त भाविकांनी मोठ्या उत्साहात साजरा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाच्या सुरुवातीस गुरु नानक देव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित भाजी विक्रेते व नागरिकांनी अभिवादन केले. त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आला.
भाजी मार्केटचे अध्यक्ष संजय मराठे त्याप्रसंगी म्हणाले की शीख धर्माचे पहिले गुरु नानक यांची जयंती.शीख धर्माचे नागरिक कार्तिक पौर्णिमेच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहतात.कारण या दिवशी गुरु नानक जयंतीचा उत्सव साजरा केला जातो.यावेळी गुरुद्वारांमध्ये भजन,कीर्तन आणि लंगरचे आयोजन केले जाते.या दिवशी नानक देवजींच्या शिकवणींचे स्मरण केले पाहिजे.सकाळी लवकर मिरवणुका काढल्या जातात आणि या काळात गुरुद्वारा विशेषतः उत्साही होतात.गुरु नानक देवजींनी समता,प्रेम आणि सेवेचा संदेश दिला.त्यांच्या शिकवणी समाजाला मानवतेकडे नेत आहेत.
कार्यक्रमाच्या वेळी भाजी मार्केट अध्यक्ष संजय मराठे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते रमेश गाढवे,तौफिक सय्यद,रमेश चौधरी,सचिन खराडे,गिरीश देवकाते,कुणाल धिवार,रमेश डफळ,अंकुश अपेट,लता चौतमल,जावेद खान,शैलेंद्र गायकवाड,नितीन कांबळे,गणेश मते,अरुण जाधव,गणेश वाघमारे,आण्णा नायडू आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.परिसरात दिवसभर आध्यात्मिक वातावरण आणि श्रद्धेचा उत्साह पाहायला मिळाला.








