शबनम न्यूज | प्रतिनिधी
भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात पहिल्यांदाच हिंदू भूषण क्रीडा महोत्सव 2025 उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून भाजपचे प्राध्यापक राजेश दत्तात्रय सस्ते व अर्चनाताई राजेश सस्ते यांच्या वतीने पिंपरी चिंचवड भागातील सर्व मल्लखांबप्रेमींसाठी रोप मल्लखांब या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या रविवारी दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजता, वैदिक विजडम इंटरनॅशनल स्कूल, इंद्रायणी पार्क शेजारी, मोशी येथे ही स्पर्धा संपन्न होणार आहे. यामध्ये मुलांसाठी पोल मल्लखांब, मुलींसाठी रोप मल्लखांब, वृक्षारोपण, प्रभाग क्रमांक तीन मधील शालेय विद्यार्थ्यांना लिखाण पॅड वाटप करण्यात येणार आहे.
यामध्ये प्रत्येक सहभागी खेळाडूला सर्टिफिकेट तर विजेत्यांना ट्रॉफी आणि पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.








