शबनम न्यूज | प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने मराठी रंगभूमी दिनाचे (५ नोव्हेंबर) औचित्य साधून, शहरातील कलावंतांसाठी एक महत्त्वाकांक्षी आणि नवीन उपक्रम ‘कलाकार कट्टा’ सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आणि रंगभूमी दिनानिमित्त मान्यवरांचा सत्कार समारंभ बुधवार, दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
‘कलाकार कट्टा’ सुरू करण्यामागे परिषदेचा उद्देश स्पष्ट आहे: शहराच्या सर्वांगीण विकासासोबतच सांस्कृतिक वृद्धी व्हावी. कला क्षेत्रांतील सर्व कलाकारांना एकाच छताखाली एकत्र आणून, त्यांच्या कलाकृतींना वाव देण्यासाठी आणि त्यांना एक अनोखे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी हा ‘कलाकार कट्टा’ सुरू करण्यात येत आहे.
प्रमुख कार्यक्रम:
- कार्यक्रमाचे स्वरूप: मराठी रंगभूमी दिनानिमित्त मान्यवरांचा सत्कार सोहळा आणि भव्य ‘कलाकार मेळावा’.
- दिनांक: बुधवार, ५ नोव्हेंबर २०२५ रोजी सायं. ४.०० वा.
- स्थळ: पं. पद्माकर कुलकर्णी कलामंदिर, तळ मजला, प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड.
नाट्य परिषदेच्या वतीने या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आणि या उपक्रमात सत्कार समारंभ सहभागी होण्यासाठी कलाकार, साहित्यिक, पत्रकार, नाट्य, संगीत, लोककलावंत तसेच नृत्य कलावंत या सर्वांना परिषदेने आग्रहाचे निमंत्रण दिले आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी सर्व क्षेत्रांतील कलाकारांनी या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.








