शबनम न्यूज | प्रतिनिधी
मोहिते वाडी , राजगुरुनगर, पुणे येथे संपन्न झालेल्या पिंपरी चिंचवड शहर जिल्हास्तर किशोरी गट निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा कला विकास प्रकल्प कबड्डी संघाच्या कु.भाग्यश्री केरूळकर व स्नेहल पवार या दोघींची बोपखेल ,पुणे येथे दि.५/११/२०२५पासून होणाऱ्या ३६व्या किशोरी गट राज्यस्तर कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सदर खेळाडू पिंपरी चिंचवड शहराचे प्रतिनिधित्व करणार आहेत.सदर खेळाडूंचे या यशाबद्दल उपायुक्त क्रीडा श्री पंकज पाटील, श्री किशोर ननवरे क्षेत्रीय अधिकारी ग, श्री.रंगराव कारंडे क्रीडा अधिकारी, श्रीमती उमा पुलगम प्रशासन अधिकारी, श्री दिपक कन्हेरे क्रीडा पर्ववेक्षक समन्वयक, श्री.बाबासाहेब राठोड मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय थेरगाव यांनी विशेष अभिनंदन करून पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्या आहेत.सदर खेळाडूंना श्री आटवे बन्सी क्रीडा पर्ववेक्षक, श्री सोनाली जाधव राष्ट्रीय खेळाडू यांचे मार्गदर्शन व श्री धनंजय झिंजुर्डे, श्री संतोष बारणे यांचे सहकार्य लाभले आहे.








