शबनम न्युज | प्रतिनिधी
दिवाळी सण हा सर्वांच्याच आनंदाचा सण या आनंदाच्या क्षणात सफाई कामगारांची दिवाळी गोड करण्याचे काम सामाजिक कार्यकर्ते संजय मराठे यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 31 मध्ये ड्रेनेज विभागातील सफाई कर्मचारी व घंटागाडीवरील कर्मचारी यांना यंदाच्या दिवाळीच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते संजय मराठे यांच्या वतीने भेटवस्तू देण्यात आल्या , तसेच दिवाळी फराळ देऊन संजय मराठे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
सदर आनंददायी उपक्रम हा चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनात केले असल्याचे संजय मराठे यांनी सांगितले.
याप्रसंगी उद्योजक रमेश गाढवे, गिरीश देवकाते, रमेश चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या सीमा मराठे, सुनील मराठे, शैलेश जाधव, सागर नाईक, साईराज रेसिडेन्सी मधील रहिवाशी ,ज्येष्ठ नागरिक व या प्रभागातील कर्मचारी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








