spot_img
spot_img
spot_img

अजितदादांची विजयी घोडदौड कायम! महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदावर चौथ्यांदा मोहोर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या (एमओए) अध्यक्षपदी सलग ४ वेळा पुन्हा एकदा सर्वसंमतीने निवड झाली आहे. अजित दादांच्या या विजयामुळे राजकारणासोबतच त्यांची क्रीडा क्षेत्रावर सुद्धा भक्कम पकड असल्याचं अधोरेखित झालं आहे.

एकूण ३१ क्रीडा संघटनांपैकी तब्बल २२ पेक्षा जास्त संघटनांनी अजित पवार यांच्या पॅनेलला पाठिंबा दिला होता. यातुन त्यांच्या नेतृत्वावर क्रीडा क्षेत्राचा असलेला विश्वास पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. अजित पवार यांच्या पॅनलमधील आदिल सुमारिवाला, प्रदीप गंधे आणि प्रशांत देशपांडे यांची उपाध्यक्षपदांवर बिनविरोध निवड झाली असून यामुळे अजितदादांच्या नेतृत्वावर असलेल्या विश्वासावर शिक्कामोर्तब झाला आहे.

या निवडणुकीआधी भाजप-युतीत समन्वय राखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा पार पडल्या. त्या चर्चेत मुरलीधर मोहोळ यांच्या पॅनेलला काही पदांचा वाटा देण्याचा निर्णय घेण्यात आला, ज्यामुळे महायुतीत समन्वय कायम राहिला. यामुळे अजित दादा पुन्हा एकदा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा कारभार चौथ्यांदा सांभाळणार आहेत.

राजकारण आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रात अजित पवार यांचा दीर्घ अनुभव आणि बेरजेचे राजकारण व यामुळे सर्व पक्ष आणि हितसंबंधी संस्थांनी त्यांच्यावर पुन्हा एकत्रित विश्वास दाखवला. राज्यातील क्रीडा आस्थापनांचे सशक्तीकरण, खेळाडू कल्याण आणि पारदर्शी व्यवस्थापन या अजितदादांच्या जमेच्या बाजू राहिलेल्या आहेत त्यामुळे अजित दादांचे नेतृत्व निर्णायक ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

नव्या कार्यकारिणीसमोर राज्यातील खेळाडू घडविणे, ग्रामीण भागातील क्रीडा पायाभूत सुविधा विकसित करणे आणि महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावर अधिक स्पर्धात्मक बनविण्याची जबाबदारी असेल. अजितदादांच्या सक्षम नेतृत्वाखाली ही वाटचाल अधिक प्रेरक ठरेल, असा सर्वसामान्यांचा विश्वास आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!