शबनम न्यूज | प्रतिनिधी
शिरीष आप्पा साठे सोशल फाउंडेशन वतीने पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 26 मधील सर्व महिला, भगिनींसाठी ‘होम मिनिस्टर खेळ पैठणीचा’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात व दिमाखात संपन्न झाला.
होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम प्रसिद्ध निवेदक ओम यादव यांच्या सादरीकरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमात असंख्य महिला, भगिनी यांनी सहभाग घेतला. या खेळ पैठणीचा कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व महिला भगिनींना भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच या कार्यक्रमात विजेत्या ठरलेल्या महिलांना विविध बक्षिसे देण्यात आली. या कार्यक्रमाचे निमित्ताने चिंचवड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी विरोधी पक्ष नेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. नाना काटे यांच्या हस्ते आगामी काळात प्रदर्शित होणाऱ्या रील स्टार या मराठी चित्रपटाचे पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी नगरसेवक चंद्रकांत तापकीर, युवा नेते रणजित कलाटे, संत तुकाराम महाराज यांचे वंशज प्रशांत महाराज मोरे, मीराताई कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाला प्रभागातील असंख्य महिला, भगिनी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्व उपस्थितांचे शिरीष आप्पा साठे यांनी आभार व्यक्त केले.








