शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 23 थेरगाव येथे दिवाळी उत्सवानिमित्त कैलास (बाबा) बारणे युवा मंच व प्रवीण नाना बारणे यांच्या वतीने थेरगाव येथील सफाई कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देण्यात आली.
यावेळी दिवाळीनिमित्त आपल्या प्रभागातील सफाई कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याकरिता तसेच दिवाळीचा आनंद वाटप करण्याकरिता त्यांना भेटवस्तू वाटप करण्यात आले असल्याचे माजी नगरसेवक कैलास (बाबा) बारणे यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी माजी नगरसेवक कैलास बाबा बारणे यांच्या समवेत शहाजी लोखंडे, मारुती मोक्ष, प्रवीण बारणे, अजय बारणे, युवा नेते प्रशांत सपकाळ, निखिल साखळे, युवराज शिंदे, सुनील घंटे, अविनाश सुतार, सौरभ पाडळे, सौरव पाडाळे, मोनू गुप्ता, प्रशांत बारणे, प्रतीक बारणे, ओंकार साबळे, राज लोकरे, योगेश मोरे, ओवी बारणे, श्रीवेद बारणे, यशश्री बारणे, आर्वी बारणे, वरद बारणे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.








