शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात एकूण ३२२ पोलीस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून, २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत इच्छुकांनी महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
भरतीतील एकूण ३२२ पदांपैकी विविध प्रवर्गांनुसार खालीलप्रमाणे वाटप करण्यात आले आहे प्रवर्ग पदसंख्या पुढीलप्रमाणे आहे. सर्वसाधारण पुरुष (९७), महिला उमेदवार (९७), खेळाडू (१६), प्रकल्पग्रस्त १६), भूकंपग्रस्त (६), माजी सैनिक (४८), अंशकालीन पदवीधर (१६), पोलीस पाल्य (१०), गृहरक्षक दल (१६), अनाथ उमेदवार (३), तसेच, आरक्षणनिहाय पदांची आकडेवारी EWS (46), SEBC (34), E&M (80), SC/ST (8), OBC (7), OBC (19), OBC (17), OBC (12), ST (22), SC (42), OBC (35).
प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येईल. या चाचणीत किमान ५० टक्के गुण मिळवणाऱ्या उमेदवारांमधून १:१० प्रमाणात लेखी परीक्षेसाठी निवड केली जाईल. लेखी परीक्षा १०० गुणांची असून, उमेदवारांनी किमान ४० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.
शारीरिक व लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. मूळ कागदपत्रांची पडताळणी करून तात्पुरती निवड यादी जाहीर केली जाईल. अंतिम गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांची निवड होईल. उमेदवार दहावी किंवा बारावी उत्तीर्ण व १८ ते २८ वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे. राज्यातील सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याने उमेदवार फक्त एका घटकातच अर्ज करू शकतो.








