spot_img
spot_img
spot_img

महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांची बदली

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) प्रदीप जांभळे-पाटील यांची शुक्रवारी (दि. ३१) बदली झाली. त्यांची सेवा त्यांच्या मूळ प्रशासकीय विभागाकडे म्हणजेच वित्त विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे. .

प्रदीप जांभळे हे वसई-विरार महापालिकेमध्ये उपायुक्त म्हणून कार्यरत होते. २२ सप्टेंबर २०२२ रोजी त्यांची प्रतिनियुक्तीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यापूर्वीच राज्य शासनाने महापालिकेमध्येच उपायुक्त असलेल्या स्मिता झगडे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली होती. शासनाने आपल्याच आदेशावर घूमजाव करत पुन्हा जांभळे यांची नियुक्ती केली होती. त्यामुळे झगडे यांनी मॅटमध्ये दावा दाखल केला होता. परिणामी जांभळे यांना नियुक्ती होताच मॅटमध्ये झगडत आपली खुर्ची वाचवावी लागली होती. त्यानंतर शासनाने दोन वर्ष त्यांना मुदतवाढ दिली होती. त्यांची मुदत संपली आहे.

गेल्या आठवड्यात महसूल विभागाने मोनिका ठाकूर यांची पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. मात्र, पदभार स्वीकारण्यासाठी नगरविकास विभागाचा आदेश आवश्यक आहे. नगर विकास विभागाचा आदेश असल्याशिवाय कोणत्याही अधिकाऱ्याला पदभार स्वीकारता येत नाही. त्यामुळे ठाकूर यांची महसूल विभागाने जरी बदली केली असली तरी नगरविकास विभागाचा नियुक्ती आदेश आवश्यक असणार आहे. प्रदीप जांभळे यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागेवर मोनिका ठाकूर यांची वर्णी लागणार की कोणी दुसरा अधिकारी अतिरिक्त आयुक्त म्हणून येणार याकडे लक्ष लागले आहे.

 

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!