spot_img
spot_img
spot_img

खेड तालुक्यातील कातकरी वस्तीमध्ये पालावरती दिवाळी साजरी

युवा मोर्चाचे अध्यक्ष दिनेश यादव यांचा पुढाकार

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी: पिंपरी चिंचवड येथील युवा मोर्चाचे अध्यक्ष दिनेश यादव यांनी  खेड तालुक्यातील शिवे गाव वनदेव कातकरी वस्तीमध्ये पालावरती साजरी केली. या उपक्रमात गावातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि सणाचा आनंद एकत्र लुटला.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनानुसार युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चा पदाधिकारी अजित कुलथे, राजेश राजपुरोहीत, अमित देशमुख, उमेश सांडभोर, अर्थव शिवेकर, ऋषिकेश भालेकर, ओकांर पवार, प्रतिक रामगुडे, साईराज भालेकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. यानिमित्ताने सरपंच अक्षय शिवेकर, शांताराम शिवेकर, ज्ञानेश्वर साळुंखे, ज्ञानेश्वर शिवेकर, संतोष शिवेकर, नामदेव शिवेकर आणि शिवाजी शिवेकर यांसह गावातील अनेक नागरिक उपस्थित होते.

युवा मोर्चाचे अध्यक्ष दिनेश यादव म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार “एक दिवा वंचितांसाठी” या संकल्पनेतून आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनानुसार भाजपा युवा मोर्चातर्फे दिवाळीमध्ये तळागाळातल्या घटकांसोबत आनंद साजरा केला. युवा मोर्चाच्या वतीने शिवे गावातील कातकरी वस्तीमध्ये  राहणाऱ्या आमच्या बांधवांसोबत दिवाळी साजरी केली..दिवाळीचा फराळ वाटप करून या कातकरी बांधवांचे तोंड गोड केले. गेल्या महिन्यामध्ये मराठवाड्यासह, सोलापूर करमाळा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली. यावेळी या गावकऱ्यांना मदत करण्यासह नुकतेच गोधन वाटप देखील केले आहे. सर्वांसोबत आणि सर्वांसाठी हेच भाजपचे धरण आहे. यासाठी आम्ही काम करत आहेत.

“वसुधैव कुटुम्बकम्” ही आपली संस्कृती आहे.
आपल्या संस्कृतीला जपत काम करण्याची प्रेरणा भाजपमधून नेहमीच मिळते. दिवाळी सणाच्या निमित्ताने खेड तालुक्यातील शिवे गावामध्ये वनदेव कातकरी वसाहतीमध्ये दिवाळीचा आनंद द्विगुणित “वसुधैव कुटुम्बकम्” ही संकल्पना रुजवण्यासाठी प्रयत्न आम्ही केला आहे.

– दिनेश यादव,अध्यक्ष: भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!