शबनम न्यूज | प्रतिनिधी
भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. यावेळी माझ्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये, याकरिता आपण राजीनामा देत असल्याचे अनुप मोरे यांनी सांगितले.
अनुप मोरे यांच्यावर नुकताच एका महिला पदाधिकारी यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे, या संदर्भात अनुप मोरे यांच्यावर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
या घटने संदर्भात आज अनुप मोरे यांनी आपला राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे दिला असून, या सर्व प्रकरणात स्वतःहून चौकशीला सामोरे जाणार असल्याचे देखील अनुप मोरे यांनी सांगितले.
ते म्हणाले, “माझे आई-वडील माझे कुटुंब आणि मी गेली 40 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे काम प्रामाणिकपणे अविरत करत आहे. बूथ अध्यक्ष ते भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष पर्यंत पोहोचण्यासाठी पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला. आमचा परिवार आणि मी सदैव भारतीय जनता पार्टी सोबत आहे आणि असेन . भारतीय जनता पार्टीची माझ्यामुळे प्रतिमा मधील होऊ नये म्हणून मी सदैव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच पार्टीतील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी यांचा माझ्या वरील विश्वासामुळे मी माझ्या भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. येत्या काळामध्ये प्रथम राष्ट्र, नंतर पार्टी, नंतर स्वतः या तत्त्वावर सदैव निष्ठेने काम करील,” असे म्हटले आहे.








