शबनम न्यूज | प्रतिनिधी
रिक्षाचालकाने खंडणी न दिल्याने त्याला कोयत्याच्या उलट्या बाजूने मारहाण करून जखमी करण्यात आले. हा प्रकार चिखली येथील सिटी प्राईड स्कूलसमोर व पाटीलनगर परिसरात ६ ते २४ ऑक्टोबर दरम्यान घडली.
प्रशांत उर्फ परशुराम सत्यवान तुपे (वय २५, रा. मोईगाव, ता. खेड, जि. पुणे), सौरभ उर्फ गोविंद संभाजी तुपे (वय २२, रा. पाटीलनगर, चिखली), कुणाल भंडारी (वय २५, रा. मोईगाव, ता. खेड, जि. पुणे), अक्षय बलभीम जाधव (वय ३०, रा. गॅलेक्सी अपार्टमेंट, पाटीलनगर, चिखली) आणि निखील गाडेकर (वय २५, रा. चिखली) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी प्रशांत तुपे, सौरभ तुपे आणि कुणाल भंडारी या तिघांना अटक केली आहे. आकाश दिलीप भुसारे (वय २५, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव, ता. हवेली, जि. पुणे) यांनी मंगळवारी (दि. २८) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपींनी फिर्यादी आकाश भुसारे त्याच्याकडून दोन हजार रुपये दरमहा खंडणी मागितली आणि पैसे न दिल्याने डोक्यात उलट्या कोयत्याचा वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपींनी परिसरात कोयता दाखवून दहशत माजवली तसेच मोबाइलवरून धमक्या देत खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केला.








