spot_img
spot_img
spot_img

कांदा, बटाटा, गाजर, मटार, तोतापुरीच्या दरात वाढ!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी फळभाज्यांची आवक कमी झाली. आवक कमी झाल्याने कांदा, बटाटा, आले, मटार, गाजराच्या भावात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली होती. इतर सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेने स्थिर होते.

गुलटेकडी मार्केट यार्डात रविवारी (दि. २६) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ८० ते ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये हिरवी मिरची आंध्र, तामिळनाडू सुमारे १४ ते १५ टेम्पो, इंदोर येथून गाजर २ टेम्पो, कर्नाटक येथून कोबी ४ टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा ५ टेम्पो, तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी २००-२५० क्रेट, कर्नाटक येथून घेवडा ३-४, कर्नाटक येथून भुईमूग २ टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे ८ ते १० टेम्पो तर इंदौर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ३० ते ३५ टेम्पो इतकी आवक झाली होती. स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे ४००-४५० गोणी, भेंडी ५ टेम्पो, गवार ३ टेम्पो, टोमॅटो ८ हजार क्रेट, हिरवी मिरची ४-५ टेम्पो, काकडी ७-८ टेम्पो, फ्लॉवर १० टेम्पो, गाजर ६ टेम्पो, कोबी ५ टेम्पो, ढोबळी मिरची ८-१० टेम्पो, भुईमूग शेंग ५०-६० गोणी, मटार ४००-४५० गोणी, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा सुमारे ६० टेम्पो इतकी आवक झाली होती, अशी माहिती मार्केट यार्डमधील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

 

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!