शबनम न्यूज | प्रतिनिधी
तुझ्या भावाला उचललं आहे, दोन हजार रुपये दे नाहीतर सोडणार नाही अशी धमकी देत खंडणी वसूल केली. ही घटना गुरुवारी (दि. २३) चिखली येथील झेंडाचौक परिसरात घडली.
ऋषीकेश बाजीराव महारनवर (रा. साने कॉलनी, मोरेवस्ती, चिखली) असे आरोपीचे नाव आहे. तो सध्या तडीपार आहे. विकास पिंटू शर्मा (वय १९, रा. झेंडाचौक, शिवकृपा हौसिंग सोसायटी, चिखली, पुणे) यांनी शुक्रवारी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला फोनवरून धमकी देत त्याच्या भावाला ओलीस ठेवले असल्याचे सांगितले. फिर्यादीने घाबरून दीड हजार रुपये आरोपीला दिले. त्यानंतर आरोपीने पुन्हा पैशांची मागणी करत पुढच्या वेळेस नाही दिलेस तर घरातील सर्वांना उचलून नेईन अशी धमकी दिली. आरोपीने तडीपार आदेशाचाही भंग केला आहे.








