शबनम न्यूज | प्रतिनिधी
खरं तर स्वच्छतेसाठी जनजागृतीसोबतच प्रत्यक्ष कृतीची अंमलबजावणी होणं अत्यंत आवश्यक आहे. अशीच एक प्रेरणादायी अंमलबजावणी दिवाळीच्या सणानंतर ‘अवकारीका’ टीमने केली. पिंपरीतील मासुळकर कॉलनीमध्ये रात्री ११ ते १ या वेळेत परिसर स्वच्छ करून टीमने समाजात आदर्श निर्माण केला.
सकाळी सफाई कर्मचारी आपलं काम प्रामाणिकपणे करतातच, पण नागरिकांकडून तत्परता येणंही तितकंच गरजेचं आहे. म्हणूनच ‘अवकारीका’ हा चित्रपट सर्वांनी पाहणं महत्त्वाचं आहे — कारण चांगली गोष्ट पोहोचायला वेळ लागतो, पण बदल नक्की घडतो “Charity begins at home” — हीच ‘अवकारीका’ चित्रपटाची खरी संकल्पना आहे. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक CA अरविंद भोसले स्वतः या स्वच्छता उपक्रमात सहभागी झाले होते.
“गोष्टी फार सोप्या असतात, आपणच त्या अवघड करून टाकतो. नेमकं कोणत्या विषयावर प्रहार करायचा हे ओळखणंही तितकंच महत्त्वाचं असतं.”
या उपक्रमात ‘अवकारीका’ टीममधील अमित माने, CA अरविंद भोसले (दिग्दर्शक व ब्रँड अॅम्बेसेडर – स्वच्छ भारत अभियान, पिंपरी चिंचवड महानगरपालिका), तसेच श्रेया भोसले, समृद्धी कुर्हाडे, संजय रुपटक्के, राहुल नलावडे आणि समीर मासुळकर यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून या स्वच्छता मोहिमेला साथ दिली.








