शबनम न्यूज | प्रतिनिधी
शिक्षण विभाग (माध्यमिक), जिल्हा परिषद पुणे आणि कमला एज्यूकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ज्युनिअर कॉलेज, चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने शाळा अंतर्गत जिल्हास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धा २०२५ चे यशस्वी आयोजन करण्यात आले . ही स्पर्धा विज्ञान विषयाविषयी विद्यार्थ्यांमध्ये रुची निर्माण करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे आणि सृजनशीलतेला वाव देणे या उद्देशाने घेण्यात आली.
या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण चौदा शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. विज्ञानावर आधारित सादरीकरणांद्वारे विद्यार्थ्यांनी सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकत विज्ञानाचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. नाट्यलेखन, अभिनय, संवाद कौशल्य, सर्जनशीलता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या निकषांवर परीक्षकांनी विजेत्यांची निवड केली.
पाहिले विजेते पारितोषिक न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडी या शाळेच्या नाटकाला मिळाले (नाटिका-किंजा इन्फनाइट) व दुसरे पारितोषिक हिंदुस्तान अँटिबायोटिक्स स्कूल पिंपरी याना मिळाले (नाटिका-पेटंट फ्री) ,तर डिजिटल भारत जीवन सक्षमीकरण या नाटकासाठी श्री छत्रपती शिवाजी विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज भोर या शाळेला तृतीय पुरस्कार मिळाला.
या स्पर्धेचे परीक्षण बानी रॉय चौधरी, निर्मला गणेश नाईक, निशा अशोक निकम यांनी केले.
स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉ अशोक नगरकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ वनिता कुऱ्हाडे यांनी केले. प्रमुख पाहुणे आपल्या भाषणातून बोलताना म्हणाले या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड, प्रयोगशीलता आणि सादरीकरण कौशल्य वृद्धिंगत झाले, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ भाऊसाहेब कारेकर शिक्षणाधिकारी(माध्यमिक) जिल्हा परिषद ,पुणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या विज्ञान स्पर्धेतून विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांनाही विज्ञान सोपे कसे होईल याचे प्रेरणा मिळणार आहे असे म्हणाले.तसेच यावेळी विशेष उपस्थिती म्हणून जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक शिक्षण विभाग ,पुणेचे विराज खराटे हे होते.सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेछ्या दिल्या तसेच समारोप प्रसंगी संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ . राजेंद्र कांकरीया, पर्यवेक्षक विराज खराटे , प्राचार्या डॉ . वनिता कुऱ्हाडे याच्या हस्ते
विजेत्या संघांना प्रमाणपत्रे व आकर्षक पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षकवर्ग, विद्यार्थी व आयोजक मंडळाचे विशेष कौतुक करण्यात आले.
या स्पर्धेसाठी संस्थेचे सचिव डॉ दीपक शहा,संस्थेच्या खजिनदार डॉ भूपाली शहा,संस्थेच्या डायरेक्टर डॉ. तेजल शहा,महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी डॉ राजेंद्र कांकरिया , शिक्षक व शिक्षकेत्तर वृंद उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचाल डॉ रवींद्र निरगुडे यांनी केले व डॉ सुनीता पटनाईक यांनी आभारप्रदर्शन केले








