संपादकीय – रेहान सय्यद
दिवाळी सण हा मोठ्या आनंदात उत्सवात सर्वत्र साजरा झाला या दिवाळीच सणाच्या अनेक राजकीय कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रभागात प्रभागातील नागरिकांपर्यंत दिवाळीच्या शुभेच्छा अनेक प्रकारे अनेक माध्यमातून पोहोचविल्या निमित्त एकच नगरपालिका व महानगरपालिका च्या निवडणुका येत्या दोन ते तीन महिन्यात होणार भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी व ठाकरेंची शिवसेना व छोटे-मोठे सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या तसेच राजकीय नेत्यांच्या वतीने लहान मोठ्यांपर्यंत दिवाळीच्या शुभेच्छा पोहोचविण्यात आल्या. आता दिवाळी संपली, आता राजकीय निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू होणार यामध्ये प्रत्येक राजकीय पक्ष हे दुसऱ्या विरोधी पक्षांवर आरोप प्रत्यारोप करणार प्रत्येक इच्छुक उमेदवार हाआपलाच पक्ष कसा उत्तम व आपलेच काम कसे चांगले हे दाखविण्याचा प्रयत्न करणार, तसेच प्रभागातआपणच कसे चांगले काम करणारे नेते असल्याबद्दलचे सांगत फिरणार, येत्या काही दिवसातच आरक्षण जाहीर होणार आहेत या आरक्षण जाहीर झाल्यानंतर पन्नास टक्के महिला या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. पिंपरी चिंचवड शहराचा विचार केला तर पिंपरी चिंचवड शहरात १२८ नगरसेवक निवडून येणार आहेत, १२८ नगरसेवकांच्या जागेच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी हजारो उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत यामध्ये 50% महिलाही आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या एकूण १२८ जागांपैकी ५० टक्के जागा या महिलांसाठी आरक्षित आहेत, एकूण ६४ जागा महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. त्यातील अनुसूचित जातीसाठी एकूण २० जागा आणि अनुसूचित जमातींसाठी तीन जागा राखीव असणार आहेत, इतर मागास वर्गासाठी (ओबीसी) 35 जागा आरक्षित असणार आहेत तर सर्वसाधारण महिलांसाठी (खुला) एकूण ३५ जागा राखीव असणार आहेत असे तब्बल ९३ जागेवर आरक्षण असणार आहे. खुल्या गटातील उमेदवारांना केवळ ३५ जागा उपलब्ध असणार आहेत. खुल्या गटातून अनेक प्रबळ व सक्षम माजी नगरसेवक पदाधिकारी व इच्छुक आहेत त्यांनी निवडणूक मैदानाची तयारी सुरू केली आहे. इच्छुकांची मोठी संख्या लक्षात घेता खुल्या गटातील जागेवर मोठी रस्सीखेच दिसून येणार आहे. त्यावर तोडगा काढताना प्रत्येक राजकीय पक्ष श्रेष्ठींना खूपच मेहनत करावी लागणार या शंका नाही.
महानगरपालिकेच्या निवडणुकी करीता हे आरक्षण जाहीर झाल्याबरोबर निवडणुकीचे फटाकडे बॉम्ब उडतील प्रत्येकाचा प्रचार सुरू होईल, प्रत्येक उमेदवार आपापल्या प्रभागात नागरिकांच्या घरी जाऊन भेटीगाठी वाढवेल काय नको, काय हवं याची काळजी घेईल प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते हे शहरात सर्वे करतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतील आणि या मुलाखतीतून योग्य उमेदवार निवडतील व निवडणूक रिंगणात पक्षाच्यावतीने उमेदवारी देऊन निवडणूक लढवतील. त्यामुळेच लेखाच्या पहिल्या ओळीतच आता दिवाळी संपली आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू होईल असे अधोरेखित करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक ही २०१७ च्या प्रभाग रचनेनुसार होणार आहे. दिवाळीनंतर म्हणजेच आता दोन ते तीन महिन्यानंतर होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत नगरसेवकांची एकूण १२८ संख्या असणारा असून जाहीर केलेल्या प्रभाग रचनेत एकही जागा वाढविण्यात आलेले नाही तसेच २०११ च्या जनगणनेनुसार ही निवडणूक होत आहे. त्यामुळे नगरसेवक संख्येत वाढ करण्यात आली नसल्याचे निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर त्यात कोणाला कोणती जागा सुटते यावरून त्या इच्छुक उमेदवाराचे भवितव्य ठरणार आहे त्यामुळे सर्वच इच्छुक उमेदवारांच्या नजरा आरक्षण सोडतीकडे लागले आहेत.







