संस्थापक नानासाहेब नवलेंसह दत्तात्रय जाधव, चेतन भुजबळ विजयी
मावळ : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत अखेर सर्वपक्षीय श्री संत तुकाराम शेतकरी विकास पॅनेलने मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय • अधिकारी मुकुंद पवार यांनी दिली.१८ जागा बिनविरोध कारखान्याच्या
संचालक मंडळातील एकूण २१ पैकी १८ जागा बिनविरोध झाल्या होत्या. तर, केवळ हिंजवडी-ताथवडे गटातील तीन जागांसाठी चार उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक लागली होती. या गटात संत तुकाराम शेतकरी विकास पॅनेलचे उमेदवार नानासाहेब नवले, दत्तात्रय जाधव, चेतन भुजबळ व अपक्ष उमेदवार बाळासाहेब भिंताडे यांच्यात लढत झाली.
शनिवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत २२,२५८ मतदारांपैकी ९,५४६ मतदारांनी आपला मतदानाचा हक बजावला होता. दत्तात्रय जाधव आज वाकड येथील द्रोपदा लॉन्स येथे तीन फेऱ्यांत मतमोजणी पार पडली. २० टेबल्सवर ४० कर्मचारी तैनात करण्यात आले होते. निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी दुपारी साडेबारा वाजता अधिकृत निकाल जाहीर केला. यामध्ये नवले यांना ८ हजार ५२४ मते मिळाली. जाधव यांना ८ हजार ३८० मते तर चेतन भुजबळ यांना ७ हजार १८९ मते मिळाली. दरम्यान, अपक्ष उमेदवार भिंताडे यांना २ हजार ५०५ मते मिळाल्याने त्यांच्या मोठ्या फरकाने पराभव झाला.
संत तुकाराम शेतकरी विकास पॅनेलचे विजयी उमेदवार
१. गट क्रमांक १ हिंजवडी ताथवडे नानासाहेब नवले (८५२४ मते), दत्तात्रय जाधव (८३८०), चेतन भुजबळ (७१८९)
२. गट क्रमांक २ पौड-पिरंगुट धैर्यशील ढमाले, यशवंत गायकवाड. दत्तात्रय उभे
३.गट क्रमांक ३ तळेगाव-वडगाव : बापूसाहेब भेगडे, माऊली दाभाडे, संदीप काशीद
४. गट क्रमांक ४ सोमाटणे-पवनानगर: छबुराव कडू, भरत लिमन, उमेश बोडके
५.गट क्रमांक ५ खेड-शिरूर हवेली: अनिल लोखंडे, विलास कातोरे, अतुल काळजे, धोंडीबा भोंडवे
६. महिला राखीव : ज्योती आरगडे, शोभा वाघोले
७. अनुसूचित जाती/जमाती : लक्ष्मण भालेराव
८. इतर मागासवर्ग : राजेंद्र कुदळे
९. विमुक्त जाती/भटक्या जमाती : शिवाजी कोळेकर