spot_img
spot_img
spot_img

एक दीप प्रकाश देतो, पण अनेक दीप एकत्र आले की सण उत्सव होतो – इरफानभाई सय्यद

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मानवतेचा खरा उत्सव साजरा करत, साद सोशल फाऊंडेशन व इरफानभाई सय्यद सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “दिवाळी आनंद सोहळा” हा उपक्रम यंदा ११ व्या वर्षी मोठ्या उत्साहात आणि आत्मीयतेने पार पडला.

हा कार्यक्रम काळभोर लॉन्स, शालिमार बँक्वेट, दुर्गानगर चौक, निगडी, पुणे येथे सायंकाळी ६ वाजता पार पडला.
या सोहळ्यात सुमारे ४०० अंध बांधव आणि भगिनींना दिवाळीच्या आनंदाची अनुभूती देत “दिवाळी फराळ किट” वाटप करण्यात आले.

प्रकाशाच्या या पर्वात समाजातील दृष्टीहीन बांधवांना आनंदाचा किरण देण्याचा हा उपक्रम म्हणजेच माणुसकीचा खरा दीपोत्सव ठरला. कार्यक्रमाचे निमंत्रक शिवसेना उपनेते तथा साद सोशल फौंडेशन चे संस्थापक/ अध्यक्ष इरफानभाई सय्यद यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम सलग अकराव्या वर्षी यशस्वीपणे पार पडला.

आपल्या मनोगतात इरफानभाई सय्यद म्हणाले कि, “दिवाळी फक्त सजावट आणि फटाक्यांचा सण नाही, ती आनंद, सहभाव आणि प्रकाश वाटण्याची प्रेरणा आहे. आपण जर एका गरजूच्या आयुष्यात थोडा प्रकाश आणला,
तर तीच खरी दिवाळी आहे.” दिवाळीचा प्रकाश फक्त घरातच नाही, मनातही उजळू द्या — आनंद वाटला कीच सण पूर्ण होतो.” पुढे बोलताना समाजसेवेतील सातत्यपूर्ण वाटचालीचा त्यांनी निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमास पिंपरी चिंचवड महापालिकेचे मा.महापौर राहुल जाधव,मा.उपमहापौर शरद बोरहाडे,मा.नगरसेविका तथा शिवसेना महिला उपनेत्या सौ.सुलभाताई उबाळे,मा.नगरसेवक उत्तम केंदळे, मा नगरसेवक.  बाप्पू घोलप, शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर,शिवसेना खेड- आळंदी विधानसभा सहसंपर्क प्रमुख श्री निलेश मुटके, शिवसेना भोसरी विधानसभा प्रमुख संभाजी शिरसाट, युवानेते  निखिल बोरहाडे,युवानेते निलेश नेवाळे, युवानेते  संतोष जाधव ,मा.  अरविंदजी सोलंकी मा.  राजेश पंगल मा.  सुशिल जैन मा.  महेंद्रशेठ ठाकुर मा.  प्रदिप धामणकर मा.  हाजी लालुभाई शेख मा. संदिप मधुरे मा.  आदिनाथ देवकर मा.  अमित जैन मा.  भूषण नांदुरकर मा. नितीन शिंदे मा.  दिलीपजी सोलंकी मा.  संजयजी सोलंकी मा.  रोहित अगरवालमा.  मल्लेश कद्रापूरकर मा.  अमोल म्हेत्रे
मा. संजय बांदल, मा.  जितेंद्र जैन मा.सतिश कंठाळे मा. अनिल दळवी मा.हर्षदजी लुंकड,मा.  प्रशांत सपकाळ, मा. चेतन चिंचवडे, मा. प्रसाद बनसोडे,
मा. सचिन चिखले, मा.  रमेश चौधरी मा. निरंजनदास अगरवाल मा. रविभाऊ गोडेकर मा. राजु पाटील मा.  लतिफभाई खान मा.  प्रभाकर गुरव मा.  प्रशांत थोरवेमा. पांडुरंग कदम मा. अनिल कातळे डॉ. श्याम आहिरराव,मा.  सुरेश चौधरी तसेच समाजसेवक, स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि साद फाऊंडेशनचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले. सर्व उपस्थितांच्या सहकार्यामुळे या सामाजिक दीपोत्सवाला खऱ्या अर्थाने उजाळा मिळाला. अंध बांधवांच्या चेहऱ्यावर उमटलेले हसू हेच या सोहळ्याचे खरे पारितोषिक ठरले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!