शबनम न्यूज , प्रतिनिधी :
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जनसंवाद कार्यक्रम पिंपरी चिंचवड शहरात थोपटे लॉन्स येथे संपन्न झाला. या जनसंवाद कार्यक्रमांमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस रमजान सय्यद यांनी प्रभाग क्रमांक 25 मधील वाकड, ताथवडे पुनावळे येथील समस्या सोडविण्यासाठी अजित पवार यांना निवेदन केले.
प्रभाग क्रमांक 25 मधील वाहतूक समस्या, पाण्याची समस्या, विजेची समस्या, रस्त्याच्या समस्या, प्रदूषण अशा विविध समस्या अजित पवार यांच्या समोर मांडल्यानंतर अजित पवार यांनी निवेदन वाचून या सर्व समस्या आपण लवकरात लवकर मार्गी लावू असे आश्वासन रमजान सय्यद यांना दिले. अजित पवार यांनी दाखवलेल्या या कार्यतत्परते नंतर रमजान सय्यद यांनी हात जोडून अजित पवार यांचे आभार व्यक्त केले.
थोपटे लॉन्स येथे 15 ऑक्टोबर रोजी झालेल्या जनसंवाद कार्यक्रम चिंचवड विधानसभा मतदारसंघातून तीन हजारापेक्षा जास्त तक्रारी दाखल झाल्या त्यापैकी बाराशेच्या वर तक्रारी जागच्याजागी अजित पवार यांनी मार्गी लावल्या.








