चिंचवड ता १४ : पिंपरी येथील गांधीनगर, खराळवाडी परिसरातील दीडशे गरजू महिलांना दिवाळी सण आनंदात व उत्साहात साजरा करता यावा यासाठी साखर, तेल, मैदा , रवा डाळीचे पीठ असलेले १५० किटचे वाटप प्रतिभा नारी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रजिना फ्रान्सिस, सुदर्शन स्पोर्ट्स क्लब मित्र मंडळाचे अध्यक्ष सचिन शिंगे ,ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार जाधव , भूषण नांदूरकर, चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलाम अली भालदार, माजी नगरसेविका उषा गजभार (चोरडिया ) योगशिक्षिका सरिता अग्रवाल, जनमन सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा श्वेता कापसे , बहुजन विकास आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष धनंजय घोलप, समाजसेविका राखी धर यांच्या हस्ते १५० गरजू व तळागाळातील महिलांना दिवाळी शिधा किटचे वाटप करण्यात आले तसेच त्यांनी यावेळी आपले मनोगतही व्यक्त केले.
दिवाळी सण सर्वत्र आनंदात साजरात करण्यात येतो. गरजू व तळागाळातील विविध घटकांना देखील दिवाळी सण आनंदाने साजरा करता यावी, यासाठी पिंपरीतील प्रतिभा नारी महिला बचत गट, सुदर्शन स्पोर्ट्स क्लब मित्र मंडळांनी विशेष पुढाकार घेऊन दिवाळी सणाचे औचित साधत हा उपक्रम सामाजिक बांधिलकीतून राबविला.
कार्यक्रमाची प्रस्तावना अध्यक्षा रजिना फ्रान्सिस यांनी केले. सूत्रसंचालन सचिन शिंगे यांनी तर कार्यक्रमाचे संयोजन महिला बचत गटाच्या उषा लष्करे , कमल कलापुरे, वैशाली मिडघुले ,मंदा दौंडकर आदींनी केले.