spot_img
spot_img
spot_img

नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने हरकती स्वीकारण्यास १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील एकूण १४ नगरपरिषद व तीन नगरपंचायती यांची सार्वत्रिक निवडणूक प्रस्तावित सार्वत्रिक निवडणुकीकरिता ८ ऑक्टोबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात होती, या प्रारुप यादीच्या अनुषंगाने १३ ऑक्टोबर १०२५ पर्यंत सूचना व हरकती स्वीकारण्यात येणार होत्या. तथापि राज्य निवडणूक आयोगाने सूचना व हरकती स्वीकारण्याची मुदत १७ ऑक्टोबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. तरी नागरिकांनी आपल्या सूचना व व हरकती सादर करण्याचे आवाहन नगरपालिका शाखेचे प्रशासकीय अधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी केले आहे.
नागरिकांनी प्राप्त झालेल्या सूचना व हरकती यांचा विचार करुन ३१ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तरी नागरिकांच्या सूचना व हरकती संबंधित नगरपरिषद व नगरपंचायत कार्यालयात स्वीकारण्यात येणार आहेत, अशी माहिती श्री. दुर्वास यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!