spot_img
spot_img
spot_img

‘वेस्ट-टू-एनर्जी प्लांट’ आणि ‘सांडपाणी शुद्धीकरण केंद्रास’ पश्चिम आफ्रिकी देशांतील शिष्टमंडळाची भेट

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या शाश्वत आणि पर्यावरणपूरक उपक्रमांची जागतिक स्तरावर दखल

शबनम न्यूज | प्रतिनिधी

ग्लोबल ग्रीन ग्रोथ इन्स्टिट्यूट (जीजीजीआय) यांच्या पश्चिम आफ्रिका सिटीवाइड इन्क्लुझिव्ह सॅनिटेशन” प्रकल्पांतर्गत आणि सेंटर फॉर वॉटर अँड सॅनिटेशन तसेच सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंटल प्लॅनिंग अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी यांच्या सहकार्याने ज्ञानविनिमय दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत पश्चिम आफ्रिकेतील सेनेगलबुर्किना फासो आणि कोट द आयव्हरी या देशांतील शिष्टमंडळाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती केंद्र (वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प) तसेच कॉम्बीट्रीट सांडपाणी शुद्धीकरण केंद्राला भेट दिली.

जीजीजीआय सध्या सेनेगलबुर्किना फासो आणि कोट द आयव्हरी या देशांमध्ये हवामान सक्षमता द्वारे सर्वसमावेशक शहरी स्वच्छता प्रोत्साहन” हा प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत महापालिकेच्या यशस्वी उपक्रमांचा अभ्यास करूनस्थानिक प्रशासनांमध्ये त्या अनुभवांचा उपयोग करण्याचा हेतू या भेटीमागे होता. महापालिकेचे कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती केंद्र आणि कॉम्बीट्रीट सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प हे देशभरातील आदर्श आणि शाश्वत उपाययोजनांचे उत्कृष्ट उदाहरण मानले जातात.

या प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व मन्सूर फॉल (गेट्स फाउंडेशनचे सल्लागार) यांनी केले. त्यांच्या सोबत जेरोम फाख्री (प्रादेशिक तांत्रिक प्रमुख – सर्क्युलर इकॉनॉमीजीजीजीआयआफ्रिका विभाग)सिदी का (प्रमुख – तांत्रिक अभ्यास कार्यालयस्वच्छता संचालनालयसेनेगल)ज्युलिएन तिअंद्रेबेओगो (महासंचालक – स्वच्छता विभागपर्यावरण मंत्रालयबुर्किना फासो)उस्सेनी ओउएद्राओगो (संचालक – क्षेत्रीय आकडेवारी विभागपर्यावरण मंत्रालयबुर्किना फासो)अद्जुआ हेलेन ब्रागोरी एप्से योकोली (संचालक – शहरी स्वच्छता आणि निचरा विभागजलसंपदा मंत्रालयकोट द आयव्हरी)डायनाबा फाये (प्रमुख – गुणवत्तासुरक्षा आणि पर्यावरण विभागराष्ट्रीय स्वच्छता कार्यालयसेनेगल) तसेच मेरी क्रिस्टिन एमी सेंट फाये (सहयोगी – स्वच्छता विभागजीजीजीआय) उपस्थित होत्या.

यावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्या अधिपत्याखाली चालू असलेल्या कचऱ्याचे व्यवस्थापनऊर्जा निर्मिती प्रक्रियासांडपाणी शुद्धीकरण तंत्रज्ञान आणि पुनर्वापर उपक्रमांबाबत तसेच मोशी येथील घनकचरा स्थानांतरण केंद्रप्लास्टिक कचऱ्यापासून इंधन निर्मिती प्रकल्पबांधकाम राडारोडा गोळा करून प्रक्रिया करण्याचा प्रकल्प (सी अँड डी वेस्ट प्लांट)बायो मेडिकल वेस्ट प्लांटमटेरियल रिकव्हरी फॅसिलिटीहॉटेल वेस्ट-टू-बायोगॅस प्रकल्पबायो मायनिंग प्रकल्पमेकॅनिकल कंपोस्टिंग प्रकल्प आणि इतर पर्यावरणपूरक प्रकल्पांविषयी सविस्तर माहिती दिली.

या भेटीदरम्यान महापालिकेचे उपअभियंता योगेश आल्हाटकनिष्ठ अभियंता दशरथ वाघोलेसल्लागार स्वरूप लगारे आणि प्रकल्प प्रमुख अशोक गुप्ता तसेच पर्यावरण विभागाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या दौऱ्याचे समन्वयन सीईपीटी विद्यापीठातील सेंटर फॉर वॉटर अँड सॅनिटेशन संस्थेच्या वरिष्ठ संशोधन सहयोगी ओमकार काणे आणि गौतमी सायमवार यांनी केले. प्रतिनिधीमंडळाने सर्व प्रकल्पांच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त करत महापालिकेच्या शाश्वत शहरी विकासासाठीच्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले. महापालिकेच्या पर्यावरणपूरक प्रकल्पांची आणि उपक्रमांची स्थानिक प्रशासनामध्ये अंमलबजावणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे कचरा व्यवस्थापनऊर्जा निर्मितीशून्य कचरा प्रकल्प यांसारखे विविध पर्यावरणपूरक उपक्रम जागतिक स्तरावर आदर्श ठरत आहेत. या उपक्रमांची दखल आफ्रिकी देशांनी घेतल्याने पिंपरी चिंचवड शहराचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक उज्ज्वल झाले आहे. भविष्यातही पर्यावरण संरक्षण आणि हरित विकासाच्या वाटेवर महापालिका वाटचाल करत राहील.

– विजयकुमार खोराटेअतिरिक्त आयुक्तपिंपरी चिंचवड महापालिका

पिंपरी चिंचवड महापालिकेने स्वच्छतापर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकास या क्षेत्रात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. जागतिक स्तरावर या उपक्रमांची दखल घेतली जात असल्याचा आम्हाला अभिमान आहे. हा ज्ञानविनिमय दौरा दोन्ही बाजूंनी अनुभवांची देवाणघेवाण घडवून आणणारा ठरला.

– संजय कुलकर्णीमुख्य अभियंतापिंपरी चिंचवड महापालिका

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!