विद्याभारती अखिल भारतीय शिक्षण संस्था पुणे यांच्या वतीने पुरस्कार प्रदान
शबनम न्यूज | प्रतिनिधी
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळांमध्ये राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची दखल घेत विद्याभारती अखिल भारतीय शिक्षण संस्था पुणे यांच्या वतीने संपूर्ण पुणे जिल्ह्यातील एकूण १५ शाळांना ‘उत्कृष्ट शाळा पुरस्कार २०२५’ देऊन गौरविण्यात आले असून, नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला या गौरवप्राप्त शाळांमध्ये एक ठळक स्थान पटकावले आहे.नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ला, पिंपरी चिंचवड शहरातील एक नामांकित संस्था म्हणून ‘पुणे जिल्हा उत्कृष्ट शाळा पुरस्कार २०२५’ ने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार सोहळा विद्याभारती, अखिल भारतीय शिक्षण संस्था, पुणे यांच्या वतीने शनिवारी, दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी ग.दि. माडगूळकर सभागृह, आकुर्डी येथे मोठ्या दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाला केरळ राज्याचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकरप्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी डॉ. सुरेश जाधव, मुकुंदराव कुलकर्णी, रघुनाथ देवकर यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमार्फत विद्यार्थ्यांच्या सृजनशीलता, आत्मविश्वास, कौशल्य विकास व सामाजिक जाणीवेच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रम राबवले जातात. कला संलग्न शिक्षण, कौशल्याधारित शिक्षण, क्रीडा व विज्ञान विषयक स्पर्धा, पर्यावरण जनजागृती, स्वच्छ भारत अभियान, प्रकल्प आधारित शिक्षण हे उपक्रम विशेष उल्लेखनीय आहेत. विद्यार्थ्यांना अनुभवाधिष्ठित आणि आनंददायी शिक्षण देण्याचा संस्थेचा प्रयत्न सातत्याने सुरु आहे.
या गौरवप्राप्त प्रसंगी पुरस्कार स्वीकारण्यासाठी संस्था व्यवस्थापक डॉ. प्रिया गोरखे , संस्था सदस्य माजी नगरसेविका अनुराधा गोरखे , संस्था सदस्य अश्विनी गोरखे आणि मुख्याध्यापिका मृदुला गायकवाड, उपस्थित होत्या .या पुरस्काराचे श्रेय खऱ्या अर्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमदार अमित गोरखे , विलास जेऊरकर , व्यवस्थापक डॉ. प्रिया गोरखे, तांत्रिक विभाग प्रमुख समीर जेऊरकर, हॉटेल मॅनेजमेंटचे प्राचार्य श्री. वैभव फंड आणि मुख्याध्यापिका मृदुला गायकवाड यांना जाते.
यांच्या कडून वेळोवेळी मिळत असलेल्या मार्गदर्शनामुळे नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आपले यश सातत्यने राखत आहे.
हा पुरस्कार नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धतीची आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या प्रयत्नांची पावती आहे. नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला मिळालेला हा सन्मान भविष्यातील शैक्षणिक वाटचालीत निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.