spot_img
spot_img
spot_img

सौ. पल्लवी विठ्ठल भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन संपन्न

शबनम न्यूज , प्रतिनिधी :

संकल्प नागरी सहकारी पतसंस्थेच्या सचिव सौ. पल्लवी विठ्ठल भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी स्वीकृत नगरसेवक श्री. विठ्ठल बबन भोईर यांच्या संकल्पनेतून परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.

या प्रसंगी विविध शासकीय योजनांचा शुभारंभ तसेच दिनांक २४ ते २६ सप्टेंबर या तीन दिवसीय आयुष्यमान भारत कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तब्बल ३७० नागरिकांनी आपली आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी पूर्ण केली असून त्यापैकी प्रातिनिधिक स्वरूपात १० नागरिकांना आयुष्यमान कार्डचे वितरण करण्यात आले. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने चिंचवड परिसरातील आदिशक्ती महिला बचत गट (केशवनगर चिंचवड), तुळजाभवानी महिला बचत गट (गणेश पेठ चिंचवडगाव), श्री महालक्ष्मी महिला बचत गट (गांधी पेठ चिंचवडगाव) आणि संत मुक्ताई महिला बचत गट (केशवनगर चिंचवडगाव) या महिला बचत गटांचा शुभारंभ देखील करण्यात आला.

या कार्यक्रमाला चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप, माजी आमदार अश्विनीताई जगताप, तसेच भाजपा पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न काटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य भारतीताई विनोदे , राजेंद्र गावडे, . सुरेश भोईर, अश्विनीताई चिंचव , मोरेश्वडेर शेडगे, महेश कुलकर्णी, क्रांतिवीर चाफेकर स्मारक समितीचे सदस्य गतिरामजी भोईर, अजित कुलथे, विजय गावडे, नुतन चव्हाण, हर्षद नढे पा., प्रदिप सायकर, रवि देशपांडे, सुनिल लांडगे, . धनंजय शाळीग्राम, . योगेश चिंचवडे, . शिवम डांगे, संतोष निंबाळकर , नरेश कदम , राहुल भोईर ,सुरज भोईर , मधुकर बच्चे , वैशाली खाडे,भोईर परिवारातील सदस्य यांच्यासह चिंचवडगाव आणि परिसरातील नागरिक बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!