शबनम न्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. मराठवाडा परिसरातील अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका बसला, या भागातील पूरग्रस्तांना राज्यातील सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी पक्षाचे शहर उपाध्यक्ष अतिश बारणे यांनी पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. पूरग्रस्त बांधवांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा मदतीचा हात या आशया खाली पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत पुरविली जात आहे. यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचे किट मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आले असून, पूरग्रस्त नागरिकांना ही मदत पाठविली जात आहे.
अतिश बारणे यांनी आपल्या परिसरात पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले होते त्यांचे या आव्हानाला उत्तम प्रतिसाद मिळाला व नागरिकांनी अतिश बारणे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात पूरग्रस्तांसाठी मदत दिली आहे.