शबनम न्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. सर्व स्तरातून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना मदतीचा ओघ सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील भाजपचे शेखर चिंचवडे यांच्या शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशन वतीने भूम-परांडा पूरग्रस्त बांधवांना मदतीचा हात म्हणून जीवनाचे वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांकडून परांडा पूरग्रस्त बांधवांना 550 पेक्षा जास्त जेवणाचे वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. सोलापूर, धाराशिव आणि मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे घरे, शेती आणि गावांचे मोठे नुकसान झाले. शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशनच्या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत केवळ दहा दिवसात मोठ्या प्रमाणात अन्नधान्य जीवनावश्यक वस्तू आणि शालेय साहित्य नागरिकांनी जमा केले. शेखर चिंचवडे यांच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि याच माध्यमातून पूरग्रस्तांना ही मदत करण्यात आली. आपल्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याने शेखर चिंचवडे यांनी प्रभाग क्रमांक 17 मधील सर्व नागरिकांचे आभार व्यक्त केले.