spot_img
spot_img
spot_img

अधिकारी व कर्मचारी ही महापालिकेची खरी ताकद – अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेची खरी ताकद म्हणजे येथील अधिकारी आणि कर्मचारी आहेत. प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करणाऱ्या प्रत्येक गुणवंत कर्मचाऱ्याचा सन्मान हा संपूर्ण संस्थेचा सन्मान आहे. सेवाभाव, कार्यतत्परता आणि नागरिकाभिमुख दृष्टिकोन या गुणांमुळेच पिंपरी चिंचवड महापालिका सातत्याने प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त सह शहर अभियंता देवन्ना गट्टुवार, उपायुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोरी नलवडे यांच्यासह ३६ जणांना ‘गुणवंत अधिकारी/कर्मचारी पुरस्कार’ अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. महापालिकेच्या सेवेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हे पुरस्कार देण्यात आले.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याला महापालिकेचे सह आयुक्त मनोज लोणकर, सह शहर अभियंता मनोज सेठीया, उपायुक्त पंकज पाटील, सहाय्यक आयुक्त अतुल पाटील, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक हे व्यासपीठावर उपस्थित होते.

पुरस्कारार्थींच्या वतीने उपायुक्त अण्णा बोदडे यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘महापालिकेतील सहकाऱ्यांच्या टीमवर्कमुळे आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळेच ही कामगिरी शक्य झाली. या सन्मानामुळे पुढील काळातही अधिक उत्साहाने, पारदर्शकतेने आणि जनहिताच्या भावनेने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.’

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

पुरस्कारप्राप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे

देवन्ना गट्टुवार (सह शहर अभियंता), अण्णा बोदडे (उपायुक्त), डॉ.किशोरी नलवडे (सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी), सत्वशील शितोळे (उप अभियंता), विजय कांबळे (उप अभियंता), ज्ञानेश्वर ढवळे (प्रशासन अधिकारी), सुधीर मरळ (कार्यालय अधिक्षक), किशोर काटे (कार्यालय अधिक्षक), विद्या किनेकर (फार्मासिस्ट), सचिन लोणे (कनिष्ठ अभियंता), सुनिल पोटे (प्रयोगशाळा सहाय्यक), गौतम इंगवले (उप अग्निशमन अधिकारी), अनंत चुटके (कॉम्प्युटर ऑपरेटर), श्रीनिवास बेलसरे (मुख्य लिपिक), नंदकुमार शिखरे (वाहनचालक), सज्जाद शेख (वाहनचालक), शरद देवकर (मेंटेनन्स हेल्पर),  बापूराव कांबळे (शिपाई), लक्ष्मण मानमोडे (मजूर), किशोर आवटे (शिपाई), शंकर तांदळे (वॉर्ड बॉय), मदन फंड (मजूर), बाबुराव कायंदे (रखवालदार), सुभाष कोकणे (रखवालदार), दिपक रसाळ (वॉर्ड बॉय), सुलोचना गवारी (वॉर्ड आया), सुधाकर गरूड (मजूर), कुंडलिक कुटे (शिपाई), संजय वडमारे (सफाई कामगार), आत्माराम ठाकुर (आरोग्य मुकादम), भिमा असवले (सफाई कामगार), अमित कोष्टी (स्प्रे कुली), अनंता भालचिम (कचरा कुली), किशोर मकासरे (सफाई कामगार), कमलेश गायकवाड (सफाई कामगार), उमेश जाधव (स्प्रे कुली).

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!