spot_img
spot_img
spot_img

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त रंगला सुरेल जल्लोष!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम रंगला. प्रशासनातील जबाबदारीसोबतच कलाविष्काराची जाण असलेल्या महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या गायनकौशल्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले.

महापालिका अधिकारी-कर्मचारी प्रस्तुत गीतगायनाचा सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह आयुक्त मनोज लोणकर, सह शहर अभियंता मनोज सेठीया, उपायुक्त पंकज पाटील, सहाय्यक आयुक्त अतुल पाटील, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सादर करण्यात आलेल्या मराठी आणि हिंदी गीतांच्या सुरेल सादरीकरणांनी वातावरण भारावून गेले. प्रत्येक सादरीकरणातून भाव, अभिव्यक्ती आणि ताल यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. काही गाणी हृदयस्पर्शी तर काही उत्साही ठरली. काही गाण्यांनी अध्यात्माची छटा निर्माण केली, तर काहींनी आनंदाचा जल्लोष उधळला. महापालिकेतील विविध विभागांतील अधिकारी-कर्मचारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांच्या सादरीकरणातून ‘ संगीत आणि गायन कला’ यांचा सुरेख मिलाफ जाणवला. आपल्या दैनंदिन कार्यात प्रामाणिकपणे झटणारे हे अधिकारी-कर्मचारी जेव्हा रंगमंचावर उभे राहिले, तेव्हा त्यांच्यातील कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमाने केवळ मनोरंजनच नव्हे, तर आपुलकी, एकता आणि सामूहिकतेचा भाव अधिक दृढ केला.

४३ व्या वर्धापन दिनाचा हा सुरेल जल्लोष पिंपरी चिंचवडच्या सांस्कृतिक संवेदनांना नवचैतन्य देणारा ठरला. सह शहर अभियंता मनोज सेठीया यांनी संयोजन केलेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमाचे निवेदन विशेष अधिकारी किरण गायकवाड आणि उपअभियंता किरण अंदुरे यांनी केले.

यांनी घेतला सहभाग

वर्धापन दिनानिमित्त आयोजित या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये के. के. काशिद, प्रदीप कोठावदे, विनोद सरकानिया, वैशाली शेलार, पुष्पलता दहिहंडे, अनिल सुतार, उज्ज्वला करपे, सागर आठवाल, महेंद्र अडसूळ, जाहीरा मोमीन, संतोष सारसर, किरण अंदुरे, सुरेश मिसाळ, अनिल लखन, रविंद्र कांबळे, स्मिता जोशी, सतिश गायकवाड, राजू कांबळे, रविंद्र ओव्हाळ, विजय कांबळे, चारुशीला फुगे, सुलक्षना कुरणे, समीर पटेल, विभावरी दंडवते, आकाश गिरबिडे, सुनिता राऊत, वैशाली थोरात, विकास जगताप आदींनी सहभागी होत गीत गायले. वाद्यसाथ नितीन खंडागळे, नितीन पवार, शाम चंदनशिवे, सुनिल गायकवाड, प्रविण जाधव, मनोज मोरे यांनी दिली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!