कस्तुरी राईज फाउंडेशन वतीने मिस अँड मिसेस इंडिया सिनेमा क्वीन स्पर्धा दिमाखात संपन्न
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरात कस्तुरी राईस फाउंडेशन वतीने मिस अँड मिसेस इंडिया सिनेमा क्वीन ही सौंदर्य स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत सिमरन संजय ही मिस इंडिया सिनेमा क्वीन तर श्रद्धा थोरात ही मिसेस इंडियासिनेमा क्वीन विजेती ठरली.
मिस अँड मिसेस इंडिया सिनेमा क्वीन या स्पर्धेत एकूण 60 प्रतिस्पर्धींनी सहभाग घेतला होता.
कस्तुरी राईज फाउंडेशन वतीने मागील 17 वर्षापासून महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. त्यांच्या माध्यमातून अनेक महिला- मुलींना या स्पर्धेत सहभागी होता आले व आपले करिअर घडवता आले. या अशा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या अनेक मुली या आज चित्रपट, टीव्ही मालिका क्षेत्रात कार्यरत आहेत.
रविवारी 5 ऑक्टोबर रोजी ग. दि. माडगूळकर सभागृहात संपन्न झालेल्या या सौंदर्य स्पर्धे सोबतच ओडिसी नॅशनल लेवल फॅशन डिझाईनिंग कॉम्पिटिशन 2025 व इंडिया सिनेमा किड्स 2025 व प्राइड ऑफ इंडिया एक्सलेन्सी अवॉर्ड 2025 या स्पर्धा ही संपन्न झाल्या.
कस्तुरी राईज फाउंडेशन सोबतच मानसी फिल्म प्रोडक्शन व ट्वेंटी फोर फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने सदर मिस अँड मिसेस इंडिया सिनेमा क्वीन 2025 स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली.
मिस अँड मिसेस इंडिया सिनेमा क्वीन ही स्पर्धा चार वयोगटात संपन्न झाली यामध्ये पंधरा ते पंचवीस या वयोगटामध्ये सिमरन संजय ही विजेती ठरली तर स्मिता मल्होत्रा ही फर्स्ट रनर अप ठरली, तर करीना धांडे सेकंड रनर अप ठरली
तसेच मिसेस या कॅटेगिरीत 25 ते 35 या वयोगटातील महिलांनी सहभाग घेतला यामध्ये श्रद्धा थोरात ही विजेची ठरली तर ऋतुजा भोसले ही फर्स्ट रनर अप ठरली. तर डॉक्टर तन्वी खाबिया या सेकंड रनर ऑफ ठरल्या, व पूजा अहिरे या थर्ड रनर अप ठरल्या.
मिसेस क्लासिक कॅटेगिरी मध्ये 35 ते 45 वयोगटातील महिलांनी सहभाग घेतला. यामध्ये माधुरी वाघमारे या विजेत्या ठरल्या तर मेघा पवार या फर्स्ट रनर ऑफ ठरल्या तर पुनम बाबुल या सेकंड रनर ऑफ ठरल्या तर अस्मिता मिश्रा या थर्ड रनर ठरल्या.
मिसेस सुपर क्लासिक कॅटेगरीमध्ये 45 ते 55 वयोगटातील महिलांनी सहभाग घेतला यामध्ये वैभवी घोडके या विजेत्या ठरल्या तर अंकिता पाबळे या फर्स्ट रनर ऑफ ठरल्या तर शिल्पा जगदाळे या सेकंड रनर अप ठरल्या.
तर मिसेस एव्हरग्रीन कॅटेगिरी मध्ये नीलिमा देशमुख या विजेत्या ठरल्या तर अलका पाटील या फर्स्ट रनर अफ ठरल्या.
या संपूर्ण कॅटेगिरी मध्ये 60 प्रतिस्पर्धी सहभागी झाले होते.
इंडिया सिनेमा किड्स या लहान मुला मुलींसाठी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये तीन ते सहा वयोगटातील मुला मुलींनी सहभाग घेतला यामध्ये मीत जाधव हा विजेता ठरला तर रिशिका राठोड ही फर्स्ट रनर ऑफ ठरली तर राजवीर कांबळे हा सेकंड रनर अप ठरला व अनाया कांबळे ही सेकंड रनर् अप ठरली.
तर वय वर्षे सात ते दहा वर्ष वयोगटामध्ये मिशिता शेट्टी विजेती ठरली तर उन्नती आढाव ही फर्स्ट रनर अप ठरली व आदिती काळे ही सेकंड रनर अप ठरली.
तर 11 ते 14 वर्षे व या गटांमध्ये दिव्य सुकाळे हा विजेता ठरला तर रिशिका ठांगे ही फर्स्ट रनर ऑफ ठरली तर दिव्या गावडे ही सेकंड रनर अप ठरली, या इंडिया सिनेमा किड्स मध्ये एकूण 30 प्रतिस्पर्धी मुला मुलींनी सहभाग घेतला होता.
याच निमित्ताने फॅशन ओडिसी ही विविध आकर्षक पोशाख परिधान विषयक स्पर्धेमध्ये वैष्णवी पांचाळ ही विजेची ठरली तर वैष्णवी हाके ही सेकंड रनर अप ठरली. तर कोमल वाघमारे ही थर्ड रनर अप ठरली.
तसेच बेस्ट टॉप टेन डिझायनर म्हणून उमा गोळंगे, प्रगती कल्लाळे, प्रीती ससाने, संघमित्रा गायकवाड, वैष्णवी होके, प्रिया गोरे, प्रांजली शेंगोळे, स्वाती जाधव यांनी बाजी मारली जो फॅशन ओडिसी नॅशनल लेवल फॅशन डिझायनर कॉम्पिटिशन मध्ये 49 फॅशन डिझायनर सहभागी झाली होते.
या स्पर्धेत विविध शैक्षणिक संस्थांनी ही सहभाग घेतला यामध्ये तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाइनिंग बीड, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फुड सायन्स अँड टेक्नॉलॉजी छत्रपती संभाजी नगर, साईकृपा कॉलेज फॅशन डिझाईन, नारायणा कॉलेज ऑफ फॅशन डिझाईनिंग उदगीर, व काही विविध ब्रँड डिझायनर बुटीक ओनर यांनी सुद्धा या स्पर्धेत सहभाग घेतला.
सदर सौन्दर्य स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कस्तुरी राईज फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष विजया सुरेश मानमोडे , इव्हेंट हेड हर्षदा गायकवाड , संस्थेचे डायरेक्टर अभिजीत मानमोडे व संयोजक सुरेश मानमोडे यांनी विशेष परिश्रम घेतले , या स्पर्धेचे जजेस प्रविणा धाडे (मिस इंडिया युनिव्हर्स 2024),अमृता विजय ( मिसेस इंडिया 2025 , फिल्म प्रोड्यूसर ) , चंद्रकांत विसपुते( चित्रपट निर्माते ) , नितीन धावणे पाटील ( उद्योजक , चित्रपट निर्माते ) ,मनोज मल्होत्रा ( साउथ फिल्म ॲक्टर ), लतिका राठोड ( परफेक्ट मिसेस इंडिया ) ,मयुरेश महाजन ( फॅशन मॉडेल ,ऍक्टर ,ग्रुमिंग ट्रेनर ) यांनी आपली जबादारी योग्य प्रकारे पार पडली.
या दिमाखदार सोहळ्यात सुरेखा क्षीरसागर ( महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी) , (स्नेहल जाधव (मिसेस एशिया युनिव्हर्स ) , डॉ. स्वाती देवरे (मिसेस इंडिया मुंबई ), डॉ. सारिका सावंत (महाराष्ट्र सौंदर्य सम्राज्ञी 2018)
आशु चौबे (ज्येष्ठ लेखिका) ,राजेंद्र शिंदे (उद्योजक निर्माता), पराग अहिरे (उद्योजक सामाजिक कार्यकर्ते) , श्री. शिरोळकर (ओम तेजा प्रोडक्शन) , श्री. गौतम गायकवाड (उद्योजक), सौ स्मिता खामकर, यांच्या श विविध कला आणि सिने क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली तसेच या भव्य दिव्य सोहळ्याचे दीपक प्रज्वलनाला मा . एडवोकेट राजेश झाल्टे , मा. राजेंद्र शिंदे (उद्योजक चित्रपट निर्माता) , मा.पराग अहिरे (उद्योजक धुळे), मा. गौतम गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मा.नगरसेवक नामदेवराव ढाके , शैलेजाताई मोरे ( माजी उप-महापौर ) यांच्या हस्ते प्राइड ऑफ इंडिया एक्सलेन्सी अवॉर्ड सन्मानित करण्यात आले ,
या समारंभात मेकअप पार्टनर क्षमा धुमाळ , अश्विनी रायकर , कॉस्ट्यूम पार्टनर रश्मी सिंग , मीडिया पार्टनर शबनम न्यूज, फोटोग्राफी पार्टनर उज्वल तायडे, ग्रुमिंग ट्रेनर , केतन आरमारकर , अँकर दिपाली पाटील , चैतन्य बागुल , राज गायकवाड, रोहित मानमोडे, अभिजीत अहिरे, उज्वल तायडे, शालोम काळोखे, शुभम पाटील यांनी आपापली जबादारी चोख सांभाळली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मा. भाऊसाहेब भोईर (अखिल भारतीय नाट्य परिषद चे अध्यक्ष) आणि मा. अनुप मोरे ( भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष) यांनी कस्तुरी राईज फाउंडेशन सोबत “इंडिया सिनेमा क्वीन २०२५ च्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना भव्य व्यासपीठ उपलब्ध करण्यास संधी दिली.
याप्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांचे तसेच सहकारी व संयोजक व पदाधिकारी यांचे सर्वांचे स्वागत व सन्मान सौ. विजयाताई मानमोडे यांनी केले.महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपण मागील सतरा वर्षापासून असे अनेक विविध उपक्रम राबवित असून यापुढेही कस्तुरी राईज फाउंडेशनच्या माध्यमातून असे उपक्रम सुरूच राहतील असेही यावेळी आपल्या प्रतिक्रिया देताना विजयाताई मानमोडे यांनी सांगितले.