spot_img
spot_img
spot_img

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी ‘पुणे चॅरिटी क्रिकेट लीग’ संपन्न

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मराठवाड्यासह सोलापूर आणि अन्य जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरग्रस्तांसाठी अलविरा मोशन एन्टरटेनमेंट च्या वतीने कशिश सोशल फाउंडेशनच्या आयोजनाने ‘पुणे चॅरिटी क्रिकेट लीग’ चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चित्रपट कलावंत, तंत्रज्ञ, डॉक्टर्स, सीए,पत्रकार, महापालिका अधिकारी, पोलिस,आयटीयन्स आदि विविध क्षेत्रातील मान्यवरांचे संघ सहभागी झाले होते तर स्पर्धेचे ब्रँड अँबेसेडर माजी एसीपी भानुप्रताप बर्गे होते.

अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीने धाराशिव, सोलापूर, मराठवाडा, नांदेड अशा अनेक भागात मोठी हानी झाली आहे. जीवित व वित्तहानी मुळे अनेक कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये पुरग्रस्ताना मदत व्हावी या उद्देशाने पुणे चॅरिटी क्रिकेट लीग या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत सहभागी संघाची मालकी मेघराज राजेभोसले, संकेत शिंदे, डॉ. अमित आंद्रे, सई वढावकर, संग्राम पवार, रिया चौहान, राहुल जोशी, डॉ. स्वप्नील कांबळे, दशरथ बच्चे , लीना मोदी, उदय देशमुख, जयदीप पाटील, मनोज शिंगुस्ते, गौरवराज यांनी स्वीकारली होती. स्पर्धेत एमआरबी आर्टिस्ट आर्मीने लीगचे विजेतेपद तर श्री गजानन 24 कॅरेट कलाकार संघाने उपविजेतेपद पटकावले.

या विषयी बोलताना अलविरा मोशन एन्टरटेन्मेंट च्या दीपाली कांबळे म्हणाल्या, खर तर पुरग्रस्तांची मदत न्हवे तर सेवा म्हणुन काम करायचे आहे.कारण मदत घेणारे हात परिस्थीपुढे हतबल आहेत त्यामुळे मदत नाही ही आमची सेवा आहे. आज वेळ त्यांच्यावर आहे उद्या आपल्यावर असेल म्हणुन आम्हांला या क्रिकेट लीग चा माध्यमातुन अनेक लोकांपर्यंत पुरग्रस्तांवर आलेल्या परिस्थीची जाणीव करून द्यायची होती आणि मानुसकीचा हात पुढे करा हे सांगायचे होते.

कशिश सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष, पुण्याचे पॅडमॅन योगेश पवार म्हणाले, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आम्ही पुणे चॅरिटी क्रिकेट लीग स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेच्या ठिकाणी मदत कक्ष उभारण्यात आला होता, यामध्ये पुरग्रस्तांसाठी कपडे, पुस्तके, लहान मुलांसाठी खेळणी, सॅनिटरी पॅड, पादत्राणे जमा करण्यात आली आता ही मदत पुरग्रस्तांना पाठवण्यासाठी एमसीए कडे सुपूर्त करण्यात येणार आहे.

चॅरिटी क्रिकेट लीगसाठी संकेत शिंदे, स्मिता मधुकर, अर्चना माघाडे, पूर्णिमा लुणावत, समीर गाडगीळ, ओंकार जाधव, आनंद खुडे, सौरभ पाटील, यांचे विशेष सहकार्य लाभले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!