spot_img
spot_img
spot_img

सरन्यायाधीश यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ ‘आप’ वतीने निषेध आंदोलन

शबनम न्यूज | प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टी, पिंपरी-चिंचवड तर्फे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, पिंपरी येथे शांततापूर्ण आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व शहराध्यक्ष रविराज काळे यांनी केले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय न्यायव्यवस्थेवरील या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत, संविधान व न्यायपालिकेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची मागणी केली.
या आंदोलनाद्वारे खालील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या:
  •  या हल्ल्यामागील सूत्रधारांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी.
  • न्यायाधीशांच्या सुरक्षेसाठी प्रभावी आणि कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्यात यावी.
  • न्यायपालिकेवर धर्मांध किंवा जातीयवादी दबाव आणण्याचे प्रयत्न तत्काळ थांबवावेत.
  • आम आदमी पार्टीचा पंजाब सरकारचा आदर्श घेऊन सर न्यायाधीश भूषण गवई साहेबांविषयी विकृत लिहिणाऱ्या सोशल
  • मीडिया अकाउंट वर ॲट्रॉसिटी चे गुन्हे दाखल करण्यात यावे. 
कार्यक्रमादरम्यान कार्यकर्त्यांनी “न्यायालयाचा सन्मान राखा”, “संविधान जिंदाबाद” अशा घोषणा देत शांततामय पद्धतीने आपला निषेध नोंदवला.
या आंदोलनात शहराध्यक्ष रविराज काळे, विकी पासोडे, राहुल मदने, सुरेश गायकवाड, वैजनाथ शिरसाट, सचिन पवार, शुभम यादव, सुरेश भिसे, यल्लाप्पा वालदूर, शिवकुमार बनसोडे, सुरेश बावनकर, सुखदेव काराळे, दमयंती नेरकर, अभिजीत कदम, प्रकाश घोडके, स्वप्निल खेडकर, हे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आम आदमी पार्टीने हा निषेध संविधाननिष्ठ आणि लोकशाही पद्धतीने पार पाडत न्यायव्यवस्थेच्या सन्मानासाठी आपला आवाज बुलंद केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!