spot_img
spot_img
spot_img

जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाकरिता आरक्षण जाहीर

शबनम न्यूज | प्रतिनिधी
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद क्षेत्रातील १३ पंचायत समित्यांच्या सभापती पदांची आरक्षण सोडत बहुउद्देशीय सभागृह, ५ वा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रक्रिया पूर्ण करुन जाहीर करण्यात आले.
यावेळी जिल्हा नोडल अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२५ तथा उपजिल्हाधिकारी (रोहयो) डॉ.चारुशीला देशमुख-मोहिते, तहसीलदार जगदीश निंबाळकर, राहूल सारंग, जि. प. प्राथमिक शाळा लोणीकंदचे शिक्षक व विद्यार्थी, लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.
इंदापूर पंचायत समिती- अनुसूचित जाती, जुन्नर- अनुसूचित जमाती महिला, दौंड आणि पुरंदर- नागरिकांचा मागासवर्ग, शिरुर आणि मावळ- नागरिकांचा मागासवर्ग महिला, वेल्हे, मुळशी, भोर आणि खेड- सर्वसाधारण महिला, हवेली, बारामती आणि आंबेगाव- सर्वसाधारण याप्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यावेळी जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठी काढून आरक्षण जाहीर करण्यात आले. हे आरक्षण सभापती पदाकरिता सोडत अडीच वर्ष कालावधीकरिता असणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!