शबनम न्यूज | प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेच्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना, रोटरी क्लब ऑफ औंध, पुणे; रोटरॅक्ट क्लब ऑफ औंध,आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ DBA कॉलेज, औंध-पुणे ६७, यांच्या संयुक्त विद्यमाने नारायण देव मंदिर, भालगुडी, ता. मुळशी, जि. पुणे येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हा कार्यक्रम घेण्यामागे महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. अरुण आंधळे यांची प्रेरणा होती. तसेच रोटरी क्लबच्या अध्यक्षा मा. योगिनी जोशी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन मा. प्रल्हाद साळुंखे – रोटरी क्लब ऑफ औंध पुणे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रल्हाद साळुंखे बोलताना म्हणाले, “पर्यावरण रक्षणाची जबाबदारी सर्वांची आहे. आज लावलेले हे वृक्ष भविष्यातील पिढ्यांसाठी अमूल्य ठरणार आहेत. या कार्यक्रमाची आजची थीम ‘एक वृक्ष आपके नाम’ अशी आहे.”
वृक्षारोपण कार्यक्रमात एकूण १०१ झाडे लवण्यात आली, यावेळी भालगुडी गावचे सरपंच मा. संतोष साठे, ग्रामसेविका मा. मनीषा काटे, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष राजेंद्र शेलार आणि विविध पदाधिकारी उपस्थित होते. विद्यार्थी विद्यार्थिनिंसह प्राध्यापक व स्थानिक नागरिकांनीही या वृक्षारोपण कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला.