शबनम न्यूज , प्रतिनिधी :
मागील आठवड्यात पावसामुळे मराठवाड्यात अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंबाचे संसार उध्वस्त झाले, आणि कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान झाले या नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक कैलास बारणे यांनी मदतीचा हात दिला.
मराठवाड्यातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याची त्यांनी मदत केली. माजी नगरसेवक कैलास बारणे यांनी छावा मराठा युवा महासंघ कडे शालेय साहित्य सुपूर्द केले.
हे शालेय साहित्य पूरग्रस्त भागातील शालेय विद्यार्थ्यांना लवकरात लवकर पोहोचविण्यात येणार आहे. कैलास बारणे यांच्या या योगदानाबद्दल छावा मराठा युवा महासंघाने आभार व्यक्त केले आहे. यावेळी छावा मराठा युवा महासंघाचे धनाजी येळकर पाटील, प्रवीण बारणे, यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.