शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी‑चिंचवड, चाकण व तळेगाव परिसरातील औद्योगिक क्षेत्रासाठी एक महत्त्वाची घडामोड म्हणजे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. या एअरपोर्टच्या स्थापनेमुळे स्थानिक उद्योगांना जागतिक बाजारपेठांशी थेट संपर्क, निर्यात‑आयात सुलभता, तसेच रोजगारनिर्मितीसाठी सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. तसेच एक्सप्रेस वेळ द्वारे या विमानतळाला पोहोचणे अतिशय सुलभ होईल चाकण भागात नियोजित विमानतळ होणार होते परंतु ते रद्द झाल्यामुळे अनेक गैरसोयींना उद्योग क्षेत्राला सामोरे जावे लागत होते आणि प्रस्तावित पुरंदर एअरपोर्ट हे उद्योजकांच्या पाहिजे तेवढ्या सोयीचे नसून नवी मुंबई येथे होणारे इंटरनॅशनल एअरपोर्ट याचा नक्कीच उद्योजकांना फायदा होईल
औद्योगिक क्षेत्रात अनेक परदेशी कंपन्यांचे प्रतिनिधी दैनंदिन भेटी देत असतात, तसेच स्थानिक उद्योजकांना विविध राज्यांमध्ये आणि देशभरात नियमित प्रवास करावा लागतो. या दृष्टिने पुण्यापासून सुमारे दोन अडीच तासांच्या अंतरावर असलेला नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट हे स्थानिक उद्योगांसाठी मोठा फायदा ठरेल. एअरपोर्टमुळे व्यवसायाचे वेळेवर नियोजन, लॉजिस्टिक सोय, आणि जागतिक स्तरावर संपर्क वाढवणे शक्य होईल.
इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी या उपक्रमाचे स्वागत करत म्हटले आहे:
“नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टचा पिंपरी‑चिंचवड, चाकण व तळेगाव भागातील औद्योगिक क्षेत्रासाठी फायदा अनेक पैलूंनी होईल. उद्योगांना जागतिक बाजारपेठांशी संपर्क, प्रवासाची सोय आणि निर्यात‑आयात सुविधांचा मोठा लाभ मिळेल ऑटोमोबाईल इलेक्ट्रॉनिक्स फार्मा इंजीनियरिंग कृषी आधारित उद्योगांना निर्यातीस चालना मिळेल विमानतळावर उभारण्यात आलेले अत्याधुनिक मालवाहतूक टर्मिनल वर्षाला 32 लाख टन माल हाताळण्यास सक्षम आहे त्यामुळे पुणे जिल्ह्यातील इंडस्ट्रीजला चालना मिळेल. इंडस्ट्रीज असोसिएशनच्या तर्फे या विमानतळाचे मनःपूर्वक स्वागत
या एअरपोर्टमुळे पिंपरी‑चिंचवड, चाकण व तळेगाव भागातील उद्योग क्षेत्र जागतिक दर्जाचे औद्योगिक केंद्र म्हणून ओळखले जाईल आणि उद्योगांच्या सतत विकासाला चालना मिळेल.