गौरी गणपती व शारदेय नवरात्री उत्सवातून जागर देवीचा सन्मान स्त्री शक्तीचा
महिला भगीनींच्या चेहऱ्यावरचे हास्य आणि आनंद हिच खरी कमाई….! सोनाली संदीप गाडे
शबनम न्यूज , प्रतिनिधी :
थेरगाव: सोनाली संदीप गाडे यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक २३ मधील महिला भगिनींच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा यासाठी गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.तसेच खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमांतून रंजक खेळ,विनोद, कॉमेडी,उखाणे,गाणी ,गप्पा, गोष्टी, नृत्य, करत महिला भगिनींनी कार्यक्रमात रंगत आणत धमाल मस्ती करत प्रचंड प्रतिसाद,गर्दीने मानाच्या पैठणी जिंकत वातावरण आनंदून गेले होते.यानंतर सजावट स्पर्धेतील सर्व विजेत्यांसह उत्कृष्ट सजावट करणाऱ्या ४० व सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना भेट वस्तू देऊन सन्मानीत करण्यात आले.
या वेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप, वरिष्ठ अध्यक्ष भाजपा नेते काळुराम बारणे,नगरसेवक अभिषेक बारणे, सिद्धेश्वर (दादा) बारणे,शिक्षण मंडळ सभापती नगरसेविका मनिषा पवार, युवा नेते तानाजी बारणे, नरेंद्र माने,सनी बारणे, ऋषिकेश दुरापे,करिष्मा बारणे, कांचन जावळे, सरपंच सोनाली खाणेकर, रितू कांबळे, रेणुका हेगडे यांच्यासह रोटरी क्लब ऑफ थेरगावचे सर्व महिला व पुरुष सदस्य तसेच मोठ्या प्रमाणात संदीप गाडे मित्र परिवार उपस्थित होता.
या वेळी गौरी गणपती सजावट स्पर्धेच्या विजेत्या प्रथम विजेत्या लता सानप ( टीव्ही), द्वितीय क्रमांक श्रीदेवी महेश शेरे (गॅस शेगडी),तृतीय क्रमांक स्नेहा सोंडकर (मिक्सर)चतुर्थ क्रमांक (इस्त्री )यांच्यासह चिंचवड विधानसभा मतदारसंघातील यशस्वी कन्या स्टॅनफोर्ड यादीत समाविष्ट झालेली जागतिक शास्त्रज्ञ डॉ. ममता सचिन सिंघवी यांना आमदारांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यावेळी सोनाली संदीप गाडे यांनी कार्यक्रमाचे प्रभावी प्रास्ताविक करून आपल्या सामाजिक कार्याचा आढावा घेत उपस्थितांची मने जिंकत कार्यक्रमाला जोरदार सुरुवात झाली.
यावेळी तानाजी बारणे, अभिषेक बारणे व आमदार शंकर जगताप यांनी त्यांच्या कार्याचे व खुमासदार वकृत्व शैलीचे कौतुक करत येत्या काळात सोनालीताई गाडे आपण पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेविका म्हणून प्रभावी कामगिरी कराल असा विश्वास व्यक्त करत विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी प्रभाग क्रमांक २३ मधील अनेक नागरिक व हजारोंच्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.