spot_img
spot_img
spot_img

पीसीसीओईची टेबल टेनिस स्पर्धेमध्ये विजयाची ‘हॅटट्रिक’

सिध्दी, खुशी, आयुषीची पुणे जिल्हा संघात निवड
पिंपरी, पुणे (दि. ०७ ऑक्टोबर २०२५) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती व मघनलाल उधाराम वाणिज्य महाविद्यालय, पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस (मुली) स्पर्धेत पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाने (पीसीसीओई) विजय मिळवला. सलग तिसऱ्या वर्षी विजय मिळवत हॅटट्रिक साधली. पीसीसीओई संघातील सिद्धी तिवारी, खुशी काळे व आयुषी कुंभारे या तीन खेळाडूंची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आयोजित आंतर विभागीय स्पर्धेसाठी पुणे जिल्हा टेबल टेनिस संघात निवड झाली.
   आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस (मुली) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पीसीसीओई, निगडी संघाने पीसीसीओईआर, रावेत संघाचा २-० गुणफरकाने पराभव करत विजेतेपद पटकाविले. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य सामन्यामध्ये पीसीसीओई, निगडी संघाने आयसीईएम, परंदवडी संघाचा व पीसीसीओईआर, रावेतने एआयटी, दिघी संघाचा पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. या स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांच्या अकरा संघांनी भाग घेतला होता. 
   पीसीसीओई, निगडी आणि पीसीसीओईआर, रावेत या संघांना विजेतेपद आणि उपविजेतेपद मिळाल्याबद्दल पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, पीसीसीओईआरचे संचालक डॉ. हरीश तिवारी यांनी खेळाडूंचे तसेच पीसीसीओईचे शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा. संतोष पाचारणे,  पीसीसीओईआरचे शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा. मिलिंद थोरात यांचे अभिनंदन केले. तसेच आंतर विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!