पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या १९ उमेदवारांना नियुक्ती आदेश वितरीत
पिंपरी, ४ ऑक्टोबर २०२५:- राज्य शासनाच्या निर्णयानुसार अनुकंपा नियुक्ती बाबतचे सुधारित सर्व समावेशक धोरण जाहीर करण्यात आले आहे. शासनाच्या १५० दिवस कार्यक्रम अंतर्गत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र आदेश वितरीत करण्याचा कार्यक्रम मुबई येथे संपन्न झाला. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात दृकश्राव्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील अशा पात्र उमेदवारांना देखील नियुक्ती आदेश देण्यात आले यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या १९ उमेदवारांचा समावेश होता. यामध्ये अनुकंपा वारस नियुक्ती १२ उमेदवारांना तर लाड समिती शिफारस वारस नियुक्ती ७ उमेदवारांना नियुक्ती पत्र आदेश वितरीत करण्यात आले.
मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. तर पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी गजानन पाटील यांच्यासह पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सह आयुक्त मनोज लोणकर देखील उपस्थित होते.
राज्य शासनाने अनुकंपा उमेदवारांना नियुक्ती पत्र वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये लिपिक पदासाठी अभिजित जाधव, समीक्षा इंदुलकर, सुशांत फलके, व्यंकटेश गोणे, शिपाई पदासाठी दीपक नवले, साहिल काशिद, नयना हुंबरे, संकेत यादव, मजूर पदासाठी गणेश पडवळ, प्रीतम कडलग स्पे कुली पदासाठी मनीष लोहारे, अमृत कांबळे,सफाई कामगार पदासाठी रोहन लोंढे, अर्चना पाथरकर, विशाल वाघमारे, श्रीदेवी गायकवाड, अजिंक्य काळोखे, प्रवीण पोटे, अभिषेक केदारी यांचा समावेश आहे.