शबनम न्यूज | प्रतिनिधी
नवरात्रात सलग १० दिवस दर्जेदार संगीत राजनींचे आयोजन करून हजारो संगीत प्रेमींना आनंद देणाऱ्या ३१ व्या पुणे नवरात्राै महोत्सवाची विजयादशमीच्या संध्येला सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्या गाण्यांची संगीतरजनी कार्यक्रमाने हजारोंच्या उपस्थित सांगता झाली. सुरवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुणे नवरात्र महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल, गायक जितेंद्र भुरुक, गायिका रुपाली आनंद,प्रिशीता पांडे यांनी पूजन करून आदरांजली वाहिली. यावेळी प्रेक्षकांनी सभागृह तुडुंब भरले होते.
“सपनोकी राणी”..”जिंदगी एक सफर”…”मेरे सामनेवली खिडकी में एक चांद का तुकडा रहता है” गा अशी असंख्य गाणी गाऊन ‘सोलफुल किशोर कुमार’ या कार्यक्रमाची जल्लोषात सुरवात गायक जितेंद्र भुरुक यांनी केली. जितेंद्र आणि गायिका रुपाली यांनी एकत्रित गात श्रोत्यांना जुन्या काळातील आठवणीत नेले
यावेळी गायकांना वादक रशीद शेख, अमन सय्यद ( की बोर्ड),सचिन वाघमारे (बासरी), मुकेश देढिया (गिटार), बाबा खान ( सॅक्सिफोन), कांचन निंबाळकर ( बास गिटार), नंदू डेव्हिड (रिदम मशीन), सोमनाथ फाटक ( तुंबा), अभिषेक भुरुक (ड्रम), स्वरन्वय ( कोरस ) यांनी आपले कौशल्य सादर करत कार्यक्रमात रंगत आणली.
पुणे नवरात्राै महोत्सव पार पडण्यासाठी अनेकांनी सहकार्य केले त्यामुळे कार्यक्रम यशस्वी होऊ शकला असल्याने विविध हितचिंतक यांचे आभार यावेळी महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांनी मानले.
भारतरत्न डाॅ.भूपेन हजारिका यांच्या स्मृत्तीस मानवंदना
आदल्या दिवशी लाेकप्रिय गायक, गीतकार, संगीतकार, वादक असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले डाॅ.भूपेन हजारिका यांना देशातील सर्वाेच्च पुरस्कार भारतरत्न, संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त झाला हाेता. त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त ३१ व्या पुणे नवरात्राै महाेत्सवात त्यांचे प्रतिमेचे पूजन, पुणे नवरात्राै महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल आणि गायक अभिषेक सराफ, गायिका तन्वी दाते आणि गायिका अवंतीका धुमणे, निवेदक आर.जे.बंडया यांच्या हस्ते करून आदरांजली वाहण्यात आली. भूपेन हजारिका यांचे प्रसिध्द ‘दिल हुम हुम करे..’ हे गाणे गायक अभिषेक सराफ यांनी गात त्यांच्या आठवणी पुनर्जागृत करण्यात आल्या.
स्वारगेट येथील गणेश कलाक्रिडा रंगमंदिर येथे याअनुषंगाने ‘हदयात वाजे स्मथिंग’ या विशेष कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले. यावेळी निर्माते व गायक अभिषेक सराफ, गायिका तन्वी दाते आणि गायिका अवंतीका धुमणे यांनी बहारदार राेमाँटिक गाणी सादर केली. प्रसिध्द निवेदक आर.जे.बंडया याने विविध अनुभवांचे किस्से सांगत कार्यक्रमात रंगत वाढवली.
‘चुरा लिया है तुमने जाे दिलकाे…’ हे गाणे गायिका अवंतिका हिने सुरेल आवाजात गात कार्यक्रमाची जाेरदार सुरुवात केली. त्यानंतर गायिका तन्वी हिने गायलेले ‘सैय्या..’ गाणे तर गायक अभिषेकचे ‘मितवा..’ गाणे ऐकून रसिकांनी टाळयांचा कडकडाट केला. जीव रंगला..तेरे मेरे मिलने की..गुलाबी आँखें..अशी एकामागाेमाग एक प्रसिध्द गाण्यांचे गायनामुळे कार्यक्रम रंगत गेला.
यावेळी गायकांना विविध गाण्यांना आवश्यकतेनुसार अभिजीत भदे (ड्रम), ओमकार इंगवले (ऑक्टाेपॅड व ढाेलक), अजय थाेरात (गिटार), शंतनु जहागिरदार (की-बाेर्ड), भारत ढाेरे (की-बाेर्ड), मंगेश जाेशी (तबला आणि बाँगाे) या वादकांनी विविध वाद्य साधनांचा वापर करुन सुरेख साथ देत आपले कौशल्य दाखवून दिले.
आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रुतिका सरोदे आणि विशेष दिव्यांग विद्यार्थी आर्या भालेराव यांचा खास सन्मान मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.
याप्रसंगी पुणे नवरात्राै महिला महाेत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल, घनश्याम सावंत ,उद्योगपती दिलीपराव ढमाले, रमेश भंडारी, नंदकुमार बानगुडे, विशाल कोंढाळकर, संजय काळोखे, विलास आवटे, निर्मला जगताप,अमित बागुल, नुपूर बागुल, प्राजक्ता ढवळे, प्रांजल गांधी, वृषाली बागुल, हर्षदा बागुल, सागर बागुल उपस्थित होते.